Type to search

जळगाव

जळगाव : नवीन बी.जे. मार्केट परिसरात आढळले मृत अर्भक

Share

जळगाव | प्रतिनिधी

नवीन बी.जे. मार्केट परिसरातील कचरा कुंडीत नवजात  स्त्री जातीच्या अर्भकाचा मृतदेह आढळला. याबाबत कळताच जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला.  

नवीन बी.जे. मार्केट परिसरातील कचराकुंडी जवळ काही कचरा वेचणार्‍या मुलांची वर्दळ असते. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कचरा वेचणार्‍या मुलांना एका कापडात गुंडाळलेले स्त्री जातीने नवजात अर्भक आढळले. त्यावेळी साक्षी ऑटो गॅरेजजवळ पेपर वाचत असलेले गॅरेजचे संचालक शेख रियान शेख मुनाफ आणि स्वच्छता कर्मचारी रवी हंसराज यांनी गर्दी का जमली आहे? हे पाहण्यासाठी गेले तर हा प्रकार समोर आला.

त्यांनी तातडीने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती दिली. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपनिरीक्षक एम.ए.वाघमारे, नाईक नीलेश पाटील, रामेश्वर ताठे यांनी घटनास्थळी येवून मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान, पोलिसांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात या अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला.
या अर्भकास फेकून देणार्‍या अज्ञात मातेवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या अर्भकाची माता व तिच्याशी संबंधितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, नवजात अर्भक हे स्त्री जातीचे असल्याने त्या बालिकेस मारुन टाकण्यात आले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!