Type to search

Featured जळगाव

जळगाव : अयोध्यानगर श्रीराम मंदिर परिसरात उद्या आनंद मेळावा

Share

जळगाव

शहरातील अयोध्यानगर परिसर माहेश्वरी सभा या संस्थेद्वारा उद्या रविवार दि.१९ जानेवारी २०२० रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे.

आनंद मेळावा म्हणजे मिष्ठानाची पर्वणीच असते यात विवीध वस्तु विक्रीचे व खाद्य पदार्थांचे जवळ पास ५० स्टॉल लावण्यात येणार आहे. मेळावा अयोध्यानगर परिसरातील श्रीराम मंदिर ग्राउंड येथे दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

या आनंद सोहळ्याचा आनंद शहरवासियांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील काबरा, उपाध्यक्ष सुर्यकांत लाहोटी, प्रकल्प प्रमुख प्रमोदकुमार हेडा यानी केले आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!