Type to search

maharashtra जळगाव

सुभाष चौक, चित्रा चौकात अतिक्रमण निर्मूलन मोहीम

Share
जळगाव । मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे शुक्रवारी शहरातील चित्रा टॉकीज चौकातील जुन्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.

चित्रा चौकातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एस.टी.डी. पीसीयु बुथ तसेच त्याला लागून असलेले सार्वजनिक स्टॅण्ड पोस्ट या कारवाईत काढण्यात आले. या चौकात असलेले एस.टी.डी.पीसीयु बुथ हे 1997 ते 1998 सालापासून त्याच ठिकाणी होते. तसेच या जागेबाबत बर्‍याच वर्षांपासून वाद होता. वारंवार तक्रारी होवून देखील हे अतिक्रमण हटत नसल्याने या अतिक्रमणाबाबत प्रश्न निर्माण झाला होता. मात्र याबाबत आयुक्तांकडून मंजुरी घेतल्यानंतर या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. यासोबतच चित्रा चौकापासून पंकज ऑटो पर्यंतच्या अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण विरोधी मोहिमेस दाणा बाजारातील पिपल्स बँक चौकापासून सुरुवात करण्यात आली या चौकातील एका बाजूच्या अतिक्रमण या पुर्वीच काढण्यात आले होते. सुभाष चौकातील पोलिस चौकीला लागून असलेले खादी ग्रामउद्योगच्या इमारतीजळील अतिक्रमण देखील या कारवाईत हटविण्यात आले. चित्रा चौक व परिसरात अतिक्रमण हटाव मोहिम नियमीत सुरु राहणार असल्याची माहिती देखील अतिक्रमण विभागातील अधिकार्‍यांनी दिली.

रस्त्याने घेतला मोकळा श्वास
दाणा बाजार ते पिपल्स बँक चौकापर्यंतच्या रस्त्यावर राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे दाणा बाजारातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून हा रस्ता प्रशस्त झाल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. चित्रा चौकातून मुख्य रस्त्याच्या कोपर्‍यावर असलेले जुने अतिक्रमणही या कारवाईत हटविण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!