Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

आसोदा गावात रस्त्यावर पडले मासे

Share

जळगाव –

तालुक्यातील आसोदा येथील महालक्ष्मी नगर पेट्रोल पंपाजवळील परिसरात आज दुपारी ११.३० च्या दरम्यान पाऊस झाला. पाऊस पडल्यानंतर (बंद झाल्यावर) नागरीक बाहेर आले असता त्यांना रस्त्यावर सर्वत्र जिवंत मासे दिसून आल्याने जणू माशांचा पाऊस याठिकाणी पडला की काय? असा भास होत होता.

रस्त्यावर ज्या ठिकाणी जिवंत मासे दिसून आले ते समान आकाराचे होते. त्याचप्रमाणे याठिकाणी कोणताही नाला किंवा नदीचा प्रवाह नाही त्यामुळे पाण्यात मासे वाहून आले असतील अशी शक्यता नाही अशी माहिती प्रत्यक्षदर्शी आसोदा येथील रहिवाशी रोशनसिंग राजपूत यांनी दिली.

पाऊस बंद झाल्यानंतर रस्त्यावर पडलेले मासे बघण्यासाठी, त्यांनी उचलण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती. गेल्या १५ दिवसांपासून परतीच्या पावसाने कहर केला आहे. रात्रंदिवस सुरू असलेल्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे.

हवेतही गारठा निर्माण झालेला आहे. सुर्यदर्शनही क्वचीतच बघायला मिळत आहे. संपूर्ण पावसाळ्यात पाऊस झाला नाही एवढा पाऊस आता होत आहे. .जिल्ह्यात सर्वत्र हा पाऊस सुरू असल्याने वाघूर धरणाचे संपूर्ण २० दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर हतनूर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे.

आसोदा येथे रस्त्यावर मासे दिसून आल्याने माशांचा पाऊस पडल्याची एकच चर्चा होत आहे. याठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात जिवंत मासे कसे आले याबाबत तर्क वितर्क लावण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!