Type to search

maharashtra जळगाव

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Share
जळगाव । जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमत्त मोबाईलद्वारे काढलेल्या 56 निवडक फोटोंचे प्रदर्शन, ‘एपिक’चे उद्घाटन रविवारी सायंकाळी नाट्यकलावंत, अभिनेते संदीप मेहता यांच्याहस्ते करण्यात आले. रोजच्या जीवनातील घटना, घडामोडी, वेगळे प्रसंग,
निसर्ग चित्र यांचे हे फोटो आहेत. भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे कला दालनात 14 फेब्रुवारीपर्यंत उद्यानाच्या वेळेत म्हणजे सकाळी 5 ते 10 व संध्यकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

‘एपिक’ म्हणजे महाकाव्य. रामायण-महाभारत ही जगद्विख्यात महाकाव्यं (एपिक) आहेत. या प्रदर्शनातून सामान्यांमध्ये दडलेल्या असमान्यत्व, प्रतिभेचा अनुभव येतो. जैन इरिगेशच्या कला विभागातील विजय जैन, योगेश संधानसिवे, तुषार बुंदे यांनी ही माहिती दिली.

अभेद्य फाऊंडेशनतर्फे शिलाई मशीन वाटप
तांबापुरा भागात स्त्री सबलीकरण या योजनेखाली महिलांना सक्षम पर्यायी रोजगार मिळावा म्हणून अभेद्य फाउंडेशनच्या वैशाली झाल्टे यांनी दोन स्त्रियांना तर मानियार बिरादरीतर्फे चार महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. नफीसा खान, नौशाद शाह, रिजवाना जावेद, मनीषा भोई, शिरीन शाह यांना मशीन सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, संचालक अब्दुल रहीम सय्यद सलीम उपस्थित होते.

गुळ-तुला; गोशाळेत 820 किलो चारा वाटप
युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे जैन हिल्स येथील डी.आर.मेहता गोशाळेत अशोक जैन यांची गुळ तुला करण्यात आली. यानंतर 820 किलो पेंढ्या ओला चारा शहरातील विविध गोशाळेत वाटण्यात आला. या शिवाय शिवकॉलनीतील लिलाई अनाथाश्रमातील मुलांना जेवण व शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी दलिचंद जैन, गफ्फार मलिक, करीम सालार, विकास मलारा, विजय जैन, राजू बाविस्कर, रमेश भोळे, शंभू पाटील, विराज कावडीया, विष्णू भंगाळे, वसंत सुराणा, दिलीप झांबड, नितिन चोपडा, जितेंद्र छाजेड आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!