Type to search

Featured आवर्जून वाचाच जळगाव

जळगाव : कादंबरी चौधरीने रेखाटलेल्या चित्रांचे अमरावती येथे (चित्रबोध) प्रदर्शन

Share
Painting Exhibition

जळगाव –

येथील कादंबरी चौधरीने रेखाटलेल्या चित्रांचे ‘चित्रबोध’ हे प्रदर्शन अमरावती शहरातील प्रसिध्द कलादालन पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स येथे दि.9 ते 13 जानेवारी दरम्यान आयोजीत केले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन खा.नवनीत रवीराणा, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पो.अ.संजीव बाविस्कर यांचेहस्ते होणार आहे.

कादंबरी चौधरी ही आय.एम.आर.महाविद्यालयात एमसीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून तीने कोणतेही प्रोफेशनल शिक्षण घेतलेले नसताना तीने रेखाटलेल्या चित्रांचे सर्वच ठिकाणी कौतुक होत आहे.

याबाबत तीने सांगितले की, लहान पनापासूनच चित्रकलेची आवड असून चित्रकलेचा छंद मनापासून जोपासत आवडत्या विषयात करीअर करण्याची इच्छा व्यक्त केली.

कादंबरीने रेखाटलेल्या उत्कृष्ट चित्रकलेसाठी तीला अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत. जळगाव येथील पी.एन.गाडगीळ आर्ट गॅलरीतही ‘चित्रांगण’ या माध्यमातून चित्र प्रदर्शन भरविले होते. त्यास जळगावच्या कलारसीकांनी भरभरून दाद दिली होती.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!