Friday, April 26, 2024
HomeUncategorizedगावठी पिस्तूल बाळगणार्‍या तरुणास अटक

गावठी पिस्तूल बाळगणार्‍या तरुणास अटक

जळगाव – 

चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील खंडेराव मंदिराजवळील रस्त्यावर गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणार्‍या मनीष किशोर पाटील (वय २५, रा.खोटेनगर, जळगाव) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २१ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पकडले. त्याच्या ताब्यातील २० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे.

- Advertisement -

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी गुप्त माहिती मिळाली होती.  त्यांनी सहाय्यक फौजदार नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, प्रवीण हिवराळे यांचे पथक तयार केले.

या पथकाने चुंचाळे गावाजवळील रस्त्यावर सापळा रचला होता. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या