Type to search

maharashtra जळगाव फिचर्स

परीरक्षण भूमापकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Share

जळगाव  – 

घराची नोंद सिटी सर्वेच्या उतार्‍यावर लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणारा परीरक्षण भूमापक प्रमोद प्रभाकर नारखेडे (वय 49) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाली.

तक्रारदाराचे राहते घर बक्षीसपत्राद्वारे आईच्या नावावरुन स्वतःच्या नावावर केलेले आहे. त्याबाबतची नोंद सिटी सर्वेच्या उतार्‍यावर लावण्याच्या मोबदल्यात 10 रोजी तक्रारदाराकडे नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील परीरक्षण भूमापक प्रमोद प्रभाकर नारखेड (रा. रामचंद्रनगर, जळगाव) याने 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यास लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई डीवाय.एस.पी.जी.एम.ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र माळी, हेड कॉन्स्टेबल अशोक अहिरे, सुरेश पाटील, सुनील पाटील, नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!