Type to search

maharashtra जळगाव

‘भाऊंच्या’ उद्यानात रविवारपासून ‘एपिक’ मोबाईल फोटो प्रदर्शन

Share
जळगाव । मोबाईलच्या माध्यमातून टिपलेल्या मनमोहक छायाचित्रांचे ‘एपिक’ मोबाईल प्रदर्शन भाऊंच्या उद्यानात 10 फेब्रुवारीपासून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले आहे.

‘एपिक’ म्हणजे महाकाव्य. रामायण-महाभारत ही जगद्विख्यात महाकाव्यं, म्हणजे ‘एपिक’ आहेत, या प्रदर्शनातून सामान्यांमध्ये दडलेल्या असमान्यत्वाच्या प्रतिभा समोर येणार आहेत. रोजच्या जीवनातील घटना, घडामोडी, वेगळे प्रसंग, निसर्ग चित्र मोबाईलच्या कॅमेर्‍यात बद्ध झालेली असतात. हे सर्व छायाचित्र या मोबाईल चित्रप्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.

10 फेब्रुवारीला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा 56 वा वाढदिवस आहे. त्यांच्यानिमित्त हे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात एकूण 56 फोटो प्रेक्षकांसाठी मांडण्यात येणार आहे. फोटो प्रदर्शन भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे कला दालनात 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान सर्वांसाठी खुले राहणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!