Type to search

जळगाव

अमळनेर तहसीलदारपदी वाघ

Share

अमळनेर । अमळनेर तहसीलदारपदी मिलिंदकुमार रामदास वाघ यांची नियुक्ती झाली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांची पारनेर जि. अहमदनगर येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर मिलिंदकुमार वाघ यांची पदोन्नतीने तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे तहसीलदार ज्योती देवरे या धुळे येथे असताना पांझरा चौपाटीचे अतिक्रमण काढण्यात आले होते.

या वेळी मिलिंदकुमार वाघ हे धुळ्यातच नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांनाही चांगला अनुभव असल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांच्याप्रमाणेच ते तहसीलदार म्हणून आपल्या कामाची तालुक्यावर छाप पाडतील, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. वाघ हे नियुक्ती आधी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत नायब तहसीलदारपदी कार्यरत होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!