स्वातंत्र्य सैनिक स्वामी पूर्णानंद यांचे निधन

0
अमळनेर । दि.2 । प्रतिनिधी-ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, गायत्री परीवाराचे अध्वर्यू, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, कूशल वक्ते, मराठीचे निवृत्त प्राध्यापक ब.लु.सोनार (भाऊ) उर्फ स्वामी पूर्णानंद (वय 92) यांचे आज दि.2 रोजी पहाटे निधन झाले.
त्यांचा समाधी सोहळा रत्नापिंप्री ता.पारोळा येथील गायत्री आश्रम परिसरात उद्या दि. 3 रोजी दू. 1 ते 5 या वेळेत गायत्री परिवाराच्या असंख्य साधकांचे उपस्थितीत होणार आहे.

आज दिवसभर त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी रामवाडी केशव नगर येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. सकाळी 8 वाजता साईरथावर त्यांची अंत्ययात्रा राहाते घरापासून निघून सडावण मार्गे रत्नापिंप्री येथील गायत्री परिवाराने तयार केलेल्या समाधीच्या जागेवर विधिवत कार्यक्रम ठेवण्यात आला आहे

प्रा.ब.लु.भाऊ यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1927 ला शिरपूर तालुक्यातील होळनांथे गावी झाला. त्यांचे शिक्षण अमळनेर येथेच झाले.1970 या वर्षी एम.ए.मराठी विषयात पुणे विद्यापीठात सुवर्णपदकासह ऊत्तीर्ण झाले.

त्यांनी प्रताप महाविद्यालयात 1951-1970या कालखंडात अध्यापक म्हणून तर 71 ते 87 मध्ये प्राध्यापक म्हणून विद्यादान केले. योग मिशन व गायत्री प्रज्ञा परिवारात सक्रीय सहभाग. यज्ञाचार्य गायत्री मुखपत्र, युगसाधना या मासिकाचे 14 वर्षे त्यांनी संपादक म्हणून कार्य केले. 9 आँगष्ट 1942 इंग्रजांना चले जाव म्हणत देशव्यापी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

त्यांनी आपल्या 8 मित्रांसह 26 जानेवारी 1944 रोजी सूभाष चौकातून इंग्रजांचे विरोधात घोषणा देत मोर्चा काढला. यात त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा झाली. संत साहित्याचे अभ्यासक, कुशल वक्ते, सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाच्या अभियानात आयुष्य समर्पित करून पू.साने गुरुजींचे सहवास प्राप्त धडपडणार्‍या मुलांपैकी एक, अनेक साधु संताचा सहवास व सेवा जिज्ञासू साधक, सद्गुगूरु दौलत स्वामी यांचेकडून योगसाधनेचा वारसा घेवून गायत्री महासिद्ध पं.श्रीराम शर्मा यांचेकडून वैदिक गायत्री परंपरा व यज्ञोपासना प्राप्त करणारे भाऊंनी साहित्य क्षेत्रातही कार्याचा ठसा उमटवित लेखन केले.

त्यांनी एम ए मराठी साठी 5 संदर्भ ग्रंथांचे लेखन केले. गायत्री महाविज्ञान यासह 100 लहान मोठ्या हिंदी ग्रंथांचा मराठी अनुवाद केला. गीतेच्या 6 व्या अध्यायावर 320 ओव्यांचा सोहं योग दर्पण आत्मचरित्र लिहिले.

तत्वचिंतनात्मक लेखन ते शेवटच्या श्वासापर्यंत करित राहिले. त्यांचे पश्चात पत्नी तसेच प्रताप महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे निवृत्त प्रा.सतीष सोनार यांचेसह दोन मूले, दोन मूली, सूना, जावाई, नातवंडे, पतवंडे सह गायत्री परिवारातील सदस्य असा मोठा परीवार आहे.

त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच रत्नापिंप्री येथे स्वत: समाधीची जागा निश्चित केली होती. रत्नापिंप्री हे माझे माहेर आहे असे ते म्हणत. त्यांनी गायत्री परिवारात संत म्हणून कार्य सूरू केले होते म्हणून त्यांना प्रा. ब. लू. सोनार या नावानंतर स्वामी पूर्णानंद या नावाने नविन ओळख निर्माण झाली होती.

संतांचे दहावे बारावे हे कार्यक्रम करित नाहीत परंतू माझ्या अंत्ययात्रेला येणार्‍यांना पोटभर जेवण द्या असे कूटूंबाला आवर्जून भाऊंनी सांगीतल्याने रत्नापिंप्री येथे त्यांच्या समाधीस्थळा जवळ भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातून गायत्री परीवारातील असंख्य चहाता वर्ग यावेळी सहभागी होणार आहे. भाऊंच्या जाण्याने कुटुंबियांसह गायत्री परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

LEAVE A REPLY

*