Type to search

जळगाव

अमळनेरात पोलिसांनी चार लाखांचा गुटखा पकडला

Share

अमळनेर । अमळनेर शहरातील चोपडा नाक्याजवळ 4 लाख रुपये किंमतीचा गुटखा पकडला आहे.

अमळनेर गुन्हे अन्वेष विभागाला मिळालेल्या माहितीनुसार आयशर (एमएच 46 एफ 5462) या गाडीतून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत होती. त्याची माहिती मिळाताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे व पोलीस निरीक्षक अंबादस मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने सापळा रचून गुटखा पकडला. पंचनामा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी किशोर साळुंखे यांना बोलावण्यात आले. त्यांनी हा 4 लाख रुपये किंमतीचा माल असण्याची शक्यता व्यक्त केली. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, एपीआय सदगीर, पीएसआय माळी, गुन्हे अन्वेषण पथकातील शरद पाटील, संजय मकडू पाटील, ईश्वर सोनवणे, भटूसिंग तोमर, योगेश महाजन, किशोर पाटील, सुनील पाटील, मधुकर पाटीलल यांनी ही कारवाई केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!