Type to search

जळगाव

शेतकर्‍यांची लूट थांबवण्यासाठी कापूस खरेदी केंद्र सुरू करा!

Share

अमळनेर । अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना योग्य असा भाव मिळावा यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरू करावी अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी एक पत्र फॅक्स पाठवून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

कापसाची खरेदी खासगीत साडेतीन ते चार हजार रुपये दराने केली जात आहे. हे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची लूट थांबविण्यासाठी राज्यपालांनी आदेश देऊन राज्यात सीसीआयच्या सर्व संकलन केंद्रांवर कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे.

खान्देशात कापसाची सर्वाधिक लागवड आहे. मात्र अतिवृष्टिीने अल्प प्रमाणात कापूस पिकला आहे, त्याला पैसे मिळत नाहीत. नवीन सरकार स्थापन झालेले नाही. यासाठी राज्यपालांनी  पणन विभागाच्या सचिवांना बोलावून शासकीय हमीभावानुसार सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू करण्याबाबत योग्य चर्चा करावी, केंद्र त्वरित सुरू करावे.

देशातील सर्वाधिक कापूस लागवड महाराष्ट्रात होते. राज्यात गेल्या पाच वर्षांपासून सरासरी 40 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होत आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागाचे शेती अर्थकारण कापूसावरच अवलंबून आहे. अलीकडे गुलाबी बोंडअळीने शेतकर्‍यांना उद्ध्वस्त केले. या हंगामात 42 लाख 54 हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाली होती. उत्पादन केवळ 71 लाख गाठी झाले.

भारतात कापसाची आयात मागील दोन वर्षांत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रचंड वाढली आहे. व्हिएतनाम व बांगलादेशातून चीनमध्ये निर्यात वाढली. केंद्र सरकारने या आर्थिक वर्षांत कापसाच्या हमीभावात 100 रुपये वाढ करून 5 हजार 550 रुपये प्रतिक्विंटल भावाची घोषणा केली. दसर्‍यानंतर नवीन कापूस बाजारात आला. मात्र, व्यापारी 3 हजार 550 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करीत आहेत. शेतकर्‍यांची क्रयशक्ती कायम ठेवण्यासाठी हमीभाव अधिक एक हजार रुपये बोनस जाहीर करण्याची मागणी आमदार अनिल पाटील यांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!