Type to search

जळगाव

अंकिता नेरकरची नगररचना आणि मूल्यनिर्धारण अधिकारीपदी

Share

अमळनेर । येथील डॉ.श्याम दत्तात्रेय नेरकर यांची मुलगी अंकिता श्यामकांत नेरकर हिची नगररचना आणि मुल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र शासन येथे अधिकारी पदावर निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2018 मध्ये साहाय्यक नगररचनाकार (श्रेणी-1,गट-ब) या राजपत्रित अधिकारी पदासाठी दोन टप्प्यांत परीक्षा घेण्यात आली.मुख्य परिक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सुमारे 12,000 प्रतिस्पर्धींतून जवळपास 650 जण मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आले. त्यांतून मुलाखतीद्वारे केवळ 172 जणांची अधिकारी पदासाठी निवड करण्यात आली. या परीक्षेत अंकिता ही अंतिम गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून 15 व्या स्थानी तर सर्व मुलींमध्ये खुल्या प्रवर्गातून सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.ही अमळनेरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

अंकिताचे शालेय शिक्षण अमळनेर येथेच सेमी इंग्रजी माध्यमातून झाले आहे. इ.10 वी एस.एस.सी परीक्षेत 96 टक्के गुण मिळवून ती सर्वप्रथम आली होती. प्रताप महाविद्यालय,अमळनेर येथून 12 वी विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण करून तिने नाशिक येथिल क.का.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून पुणे विद्यापीठाची स्थापत्यशास्त्राची पदवी संपादित केली आहे. लहानपणापासूनच नेतृत्व आणि वक्तृत्वाचे गुण असलेल्या अंकिताला चित्रकला, हस्तकला, साहित्य, कविता, गायन, अभिनय, सुत्रसंचालन इत्यादी कलागुणांत विशेष कौशल्य आणि रुची आहे.

शालांत परिक्षांबरोबरच स्कॉलरशिप, एन.टी.एस.इ., एम.टी.एस.इ. यांसारख्या विविध स्पर्धा परिक्षांत गुणवत्ता यादीत क्रमांक पटकावत तिने अनेक शिष्यवृत्तीही मिळवल्या आहेत. अभियांत्रिकीची पदवी देखील प्रथम श्रेणीत विशेष प्रविण्यासह प्राप्त केली आहे. हे सातत्य कायम ठेवत पुन्हा एकदा स्वअभ्यासाच्या बळावर कोणतेही क्लासेस न करता यंदाच्या एम.पी.एस.सी.सारख्या कठिण परीक्षेत प्रथम प्रयत्नातच अंकिताने हे सुयश प्राप्त केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!