Type to search

जळगाव राजकीय

अवघ्या १० मिनिटांत घेतला जनादेश

Share

अमळनेर| निम्न तापी प्रकल्पाला १५०० कोटी रुपये मंजूर केले असल्यामुळे या भागात सिंचन वाढून शेतकर्‍यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लवकरच निधी मिळवून देऊन धरणाचा प्रश्न आमचेच शासन पूर्ण करणार आहे, त्यामुळे तुमचा जनादेश घ्यायला आलो आहे, तुमचा जनादेश आहे का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागत सभेत केला. जनतेनेही मोठ्या आवाजात त्यांना प्रतिसाद दिला.

दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा अमळनेरात पोहचली. येथील फरशी पुलावर रमाबाई आंबेडकर चौकात सभेला सुरुवात झाली. वाहनावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी होते.

यात्रेचे आगमन होताच सिद्धार्थ व्यायाम शाळा लेझीम मंडळ, संत सखाराम महाराज वारकरी पाठशाळा यानीं भव्य स्वागत केले. आपल्या १० मिनिटांच्या मनोगतात त्यांनी जनतेची मने जिंकली, विकासाचा आलेख उंचावताना २० हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग, १० हजार किमीचे राज्यमार्ग, सुमारे १८ हजार गावांमध्ये पाणीपुरवठा योजना, सिंचन योजना राबविल्या, अजून भरपूर काही करायचे असून तुमचा दिलेला आशीर्वाद हाच जनादेश समजून जात असल्याचे मुख्यमत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी माजी आमदार साहेबराव पाटील, डॉ बी.एस.पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार, भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब जीवन पाटील, श्याम अहिरे, रामभाऊ संदानशिव, संचालक, पंचायत समितीचे सदस्य भिकेश पाटील, प. स. सभापती बायजाबाई भिल,कृ उ बा उपसभापती ऍड. श्रावण ब्रमहें, उपनगराध्यक्ष बिरजू लांबोळे, दलीत नेते रामभाऊ संदानशिव, दूध संघ उपसभापती महेंद्र महाजन, महेश पाटील, शहर अध्यक्ष शीतल देशमुख, जिजाब पाटील, हिरालाल पाटील, उमेश वाल्हे, दिलीप ठाकूर, सर्व नगरसेवक, जि .प. सदस्य मीनाताई पाटील, संगीत भिल, सोनुबाई भिल, प. स. सदस्य रेखाताई पाटील, कविताताई पाटील, भिकेश पाटील, विनोद पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख राजेंद्र पिंगळे, तालुका अध्यक्ष विजय पाटील, भूत बापू सर्व शिवसेना कार्यकर्ते, आरपीआय तालुका अध्यक्ष यशवंत बैसाने व पदाधिकारी, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील, ए. टी. पाटील, महेंद्र बोरसे, राहुल पाटील, सदाशिव पाटील, महेश पाटील, महेश देशमुख आणि अमळनेर तालुक्यातील हजारोच्या संख्येने समर्थक उपस्थित होते.

पुरग्रस्तांसाठी निधी सोपवला
मुख्यमंत्री मदत निधीसाठी, आमदार स्मिता वाघ यांनी १ लाख ११ हजार, माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी ५० हजार, अमळनेर फोटोग्राफर असोसिएशन ११ हजार १११ ,अमळनेर टॅक्सी युनियन ११ हजार, कविता चेतन जाधव यांनी ५ हजार याप्रमाणे मदत जाहीर करून मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी मार्केटचे उपसभापती ऍड एस एस ब्रह्मे,माजी सभापती शाम अहिरे, नगरसेविका सौ नूतन पाटील,महेंद्र पाटील,शेखा मिस्तरी,विक्रांत पाटील,सुरेश पाटील,नाटेश्वर पाटील,महेश पाटील,उमेश वाल्हे,महेंद्र महाजन,संदीप पाटील,जिजाब पाटील,दिलीप ठाकूर,राजेंद्र यादव,निशांत अग्रवाल,दिलीप ठाकूर,निवास मोरे,राजेश वाघ,राहुल पाटील,प्रकाश पाटील,एम डी चौधरी,जुलाल पाटील,चंद्रकांत कंखरे,दीपक पाटील,चेतन जाधव,कविता जाधव,सौ माधुरी पाटील,प स सदस्य कविता पाटील,विनोद जाधव यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. महाजनादेश यात्रेचे अमळनेरच्या पैलाड भागात हेडावे चौफुलीवर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीतूनच उपस्थित पदाधिकारींचे पुष्पगुच्छ स्वीकारले. समितीचे सुभाष चौधरींनी हातात हात देत मुख्यमंत्री यांचे आभार मानले. समितीचे पदाधिकारी रणजित शिंदे, प्रशांत पाटील, सतीश काटे, श्याम पाटील आदिंसह माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, भाजप पदाधिकारी बजरंग अग्रवाल, लालचंद सैनानी आदिसह विविध संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदिवासी ठाकुर जमातीला न्याय द्या.!
महा जनादेश यात्रेच्या आगमनाप्रसंगी हेडावे चौफुलीवर महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमातीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीतूनच महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाच्या वतीने अमळनेर अध्यक्ष दिलीप ठाकूर, राज्य सरचिटणीस रणजित शिंदे यांनी दिलेले ठाकूर जमातीच्या विविध प्रश्नांचे निवेदन स्वीकारले. निवेदनावर राज्य सरचिटनिस रणजित शिंदे, जिल्हाध्यक्ष गोपाळराव ठाकूर, अमळनेर अध्यक्ष दिलीप ठाकूर, कार्याध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव प्रकाश वाघ, आदींच्या स्वाक्षरी होत्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!