Type to search

जळगाव

तालुक्याच्या विकासाला कोणी खीळ घालू नये-गोकुळ पाटील

Share

अमळनेर । अमळनेर तालुक्यातील उद्योग बंद पडल्यानंतर शेतकर्‍यांच्या मागणीनुसार सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन दूध संघाची स्थापना केली असून जिल्ह्यात सर्वधिक दूध उत्पादक तालुका म्हणून अमळनेर चे नाव असल्याने तालुक्याच्या विकासाला कोणी खीळ घालू नये अशी प्रतिक्रिया तापी दूध संघाचे अध्यक्ष गोकुळ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. संघाचा शेअर्स विक्री शुभारंभ बाजार समितीत करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

दोन दिवसांपूर्वी तालुक्याच्या दूध संघास काहींनी विरोध केला मात्र प्रताप मिल, विप्रो, आर. के. पटेल सारखे उद्योगात उत्पादनावर परिणाम झाल्याने रोजगार कमी झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती गरजेची बाब होती जिल्ह्यात सर्वधिक दूध संस्था 118 या तालुक्यात आहेत. गुजरात मधील अमूल, वसुंधरा कंपनीला तसेच मध्यप्रदेश ,मुंबई, चाळीसगाव, शिंदखेडा , धुळे आदी ठिकाणी अमळनेरहून दूध जात आहे मंदीच्या काळात देखील तालुक्यातून दररोज 67 हजार लिटर दुध जात आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी स्थापन केलेला दूध संघ हा तालुक्याच्या प्रगतीला चालना देणाराच ठरणार आहे. आमची स्पर्धा कोणाशीच नाही त्यामुळे कोणीही आडकाठी घालण्याचा प्रयत्न करून जनतेची दिशाभूल करू नये.

दूध संघामार्फत सुगंधी दूध , सुगंधी ताक सह शुद्ध पाणी , पशु खाद्य निर्मिती केली जाणार आहे.त्यामुळे अनेकांना उद्योग मिळणार असून जोड धंद्यांना चालना मिळणार असल्याचे ही गोकुळ पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे आ. एकनाथराव खडसे पशु ,दुग्ध व मत्स्य मंत्री असतांना त्यांच्या मार्गदशनाने अमळनेरात दूध संघ स्थापण्याची कार्यवाही सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्याच दिवशी एक हजार पन्नास शेअर्स विक्री झाल्याचे गोकुळ पाटील यांनी सांगितले.

शुभारंभ प्रसंगी माजी आ. साहेबराव पाटील , बाजार समितीचे माजी सभापती उदय वाघ, संघाचे व्हा. चेअरमन महेंद्र महाजन, कार्याध्यक्ष महेश पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील, भाजप चे शहराध्यक्ष शीतल देशमुख, राष्ट्रवादीचे जितेंद्र राजपूत ,अ‍ॅड. गिरीश पाटील, बाजार समिती व्हा.चेअरमन अ‍ॅड.एस. एस. ब्रम्हए , संचालक विजय पाटील , श्याम पाटील , सुरेश पिरनपाटील ,एन. डी. पाटील, किरण पवार, महेंद्र बोरसे ,दिनेश शिसोदे ,श्रीनिवास मोरे ,जिजाबराव पाटील , एम. डी. चौधरी, विजय कहारू पाटील , काशीनाथ चौधरी , भटा पाटील , ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!