अमळनेरात लाखो रुपयांचा गुटखा जप्त

0
अमळनेर । दि.6 । प्रतिनिधी-शहरातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या कार्यवाहीत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून नाशिक, जळगाव व धुळे येथील अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत हा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
लाखो रूपये किमतीचा गुटखा सापडल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून गुटखा बंद झाल्यापासून अमळनेर शहरात ही पहिलीच मोठी धडक कारवाई करण्यात आलेली आहे.
शहरातील आययुडीपी कॉम्प्लेक्समध्ये दुपारी 2 च्या सुमारास झालेल्या धडक कारवाईत सव्वा चार लाखांचा गुटखा आढळुन आला त्यात विविध प्रकारच्या गुटखा पुड्या, सुगंधित तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, पान मसाला व गोड सुपारीचा माल जप्त करण्यात आला आहे.

गोकुळ पाटील यांच्या ओम टी शनीपेठ पैलाड प्रकाश वासवाणी चोपडा रोड धुळे यांच्या गोदामात हे छापे घालून ही कारवाई झाली आहे

यात सर्व अन्न सुरक्षा अधिकारी अनिल गुजर, दिलीप सोनवणे, संदीप देवरे,जळगांव अनंत पवार, दिनेश तांबोळी, गोविंद चावडा, प्रमोद पाटील, गुलाब वसावे नाशिक यांनी सहआयुक्त नाशिक उदय वंजारी, सह आयुक्त लक्ष्मण दराडे, धुळे गुप्ता वार्ता शाखेचे गुलाबसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केली.

यात ओम टी 3 लाख 33 हजार, प्रकाश वाधवाणी 31 हजार 335 गोकुळ पाटील 50 हजार 867 असा एकूण सव्वा चार लाखांचा गुटखा जप्त केला आहे सर्व मुद्देमालाचा पंचनामा करून अन्न व सुरक्षा विभागाने जप्त करून नेला आहे.

कारवाईत आयुक्त अन्न व सुरक्षा विभाग व माणके कायदा अंतर्गत खटले दाखल करण्यात येतील यात न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते आधी ह्या कारवाईत पोलिसांची मदत घ्यावी लागत होती परंतु आता मा उच न्यायालयाच्या आदेशाने पोलिसात गुन्हा दाखल न करता न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात येईल असे तेथील अधिकार्‍यांनी सांगितले

दरम्यान अन्न व सुरक्षा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी कारवाई केल्याचे समजते मात्र एकाच ठिकाणी तिघांचा जप्त केलेला मालाची सविस्तर टिपणी (पंचनामा) केला असून तिन्ही जिल्ह्यातील अधिकारी गावाला आमंत्रण दिल्याचा आव आणून एकाच ठिकाणी पंचनाम्याची कारवाई केली. त्यामुळे ही कारवाई फक्त नावाला व देखावा असल्याची दबक्या आवाजात व्यावसायिकांची चर्चा सुरु होती.

तसेच झालेली कारवाई ही फक्त नावाला असल्यामुळे पुन्हा शहरात जोमाने गुटखा विक्री होईल, यात शंका नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यात बदल झाल्यामुळे व पोलिसांचा हस्तक्षेप नसल्यामुळे ही कारवाई पारदर्शक होईल का? असा प्रश्न व्यवसायिकांना पडला आहेे.

 

LEAVE A REPLY

*