जळगाव-मुंबई विमान वाहतुकीचे वेळापत्रक जाहीर

0
जळगाव । दि.16। प्रतिनिधी – जळगाव ते मुंबई आणि मुंबई ते जळगाव अशी विमान वाहतुक सेवा दि. 18 सप्टेंबरपासून सुरू होणार असुन त्यासंदर्भात लवकरच विमानतळ विकास प्राधीकरणाचे अधिकारी विमानतळाला भेट देणार असल्याची माहिती व्यवस्थापक योगेश शेंडे यांनी दिली.
दरम्यान मुंबई-जळगाव सकाळी 10.05 तर जळगाव-मुंबई सकाळी 11.50 ला टेकऑफ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या केंद्र शासनाच्या उडाण या विमानमार्ग योजनेत जळगावचाही समावेश झाला आहे.
दरम्यान दि. 18 सप्टेंबरपासून जळगावकरांना जळगाव ते मुंबई अवघ्या 1250 ते 2500 रुपयात विमानप्रवास घडणार आहे.
जळगाव शहरालगत असलेल्या कुसुंबा गावाजवळ 300 हेक्टर परिसरात जळगाव विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात आले होते.
दि.23 मार्च 2012 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते.

दरम्यान केंद्र शासनाने उडाण योजनेंतर्गत 45 मार्ग जाहीर केले. यात राज्यातील त्यात नांदेड, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि जळगाव या पाच शहरांचा समावेश आहे.

या पाचही शहरांमधून मुंबई, पुणे, हैद्राबाद अशी विमान वाहतुक सुरु होणार आहे. यात जळगाव विमानतळावरुन जळगाव ते मुंबई अशी विमान वाहतुक डेक्कन एअरलाईन्स या कंपनीच्या 18 प्रवासी क्षमतेच्या विमान वाहतुकीची सेवा जळगावातून उपलब्ध होणार आहे.

दि. 18 सप्टेंबर रोजी ही वाहतुक सेवा सुरू होण्याची शक्यता असून विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांकडून लवकरच याबाबत पाहणी होणार असल्याची माहिती व्यवस्थापक योगेश शेंडे यांनी दिली.

 

 

LEAVE A REPLY

*