Type to search

जळगाव फिचर्स

बंदी घातलेल्या वस्तूंवर प्रशासनाची कारवाई थंड

Share

जळगाव  – 

शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापूर्वी गुटखा, सिगारेट तसेच प्लास्टिक वापराविषयी व रेल्वे, बसस्थानकासह अन्य चौकाचौकात रस्त्यांवर अन्नपदार्थ विक्रेत्यांविरुद्धदेखील अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग प्रशासनाकडून राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबवण्यात आली होती. सत्ता बदलानंतर कुलकुल वातावरण असल्यानेच की काय प्लास्टिक, गुटखाबंदीसह रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांंवरील कारवाई थंड बस्त्यात जमा झाली असल्याची स्थिती दिसून येत आहे.

शहरासह जिल्हयात लग्नसमारंभ वा अन्य कार्यक्रमांच्या ठिकाणी वापरण्यात येणारे कागदी, प्लास्टिक पत्रावळया, ग्लास यासह उरलेले अन्नपदार्थांची विल्हेवाट न लावता ते तसेच उघडयावर टाकून दिले जात आहेत. शहरात रेल्वे स्थानक परिसरासह अन्य ठिकाणी मोठमोठया गटारे, कचराकुडयांपासून काही अंतरावरच मोठया प्रमाणावर तयार खाद्यपदार्थाचे लोटगाडयांवर विक्री करण्यात येते. तसेच घरपोच पार्सल देणारे देखील व्यवसायिकांच्या आजूबाजूला मोठया प्रमाणावर अस्वच्छता आहे. याकडे स्थानिक प्रशासनांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.

साथरोगांच्या संक्रमणाची भीती

सद्य:स्थितीच्या दिवसांत सर्दी,पडसे, खोकला यासारख्या अन्य साथरोगांच्या आक्रमणाची भिती व गेल्या महिना पंधरादिवसापासून कोरोना व्हायरस रोगाची भिती पाहता अन्न भेसळ प्रतिबंधक, प्लास्टिकविक्री प्रतिबंधक विभाग, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी विभागांकडून सर्रास दुर्लक्षच केले जात आहे. चार पाच महिन्यांपूर्वी अन्न पदार्थ भेसळ प्रतिबंधक विभागाकडून शहरासह जिल्ह्यातील रेल्वे, बसस्थानकांसह हॉटेल, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल विक्रेते, पानठेल्यांवर गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट विक्रेत्यांसह मठ्ठा,विशिष्ठ जाडीचे मायक्रॉनपेक्षा कमी क्षमतेचे प्लास्टिक साठवणूकदार, विक्रेते, पुरवठादार यांच्याविरूद्ध धडक मोहीम राबवली होती. यांत दुग्धजन्य पदार्थ, पनीर,मावासह हजारो किलोग्रॅम खाद्यतेल साठा जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला होता. त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

पेट्रोलपंपावर सुविधांचा बोजवारा

अन्न भेसळ प्रतिबंधक विभागासह जिल्हयात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेल पंपांवर लिटर मिटर मागे मोठया प्रमाणावर पेट्रोल चोरी केली जात असल्याच्या तक्रारी ग्राहक करीत आहेत. पेट्रोल भरण्यासाठी गेल्यानंतर मिटरवर शून्यानंतर लगेच 12/25 असे लिटरचे आकडे दिसून येतात व तेच पेट्रोल मोजमाप केले असता किमान शंभर ते दोनशे मिलीगॅ्रम कमी भरलेले आढळून येते अशा अनेक तक्रारी केल्या जात आहेत परंतु पेट्रोल डिझेल वजन माप निरीक्षक विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. पेट्रोल-डिझेल पंपावर दुचाकी, चारचाकी वाहनाच्या चाकांमधील हवा तपासणी सुविधा मोफत असल्याचे बोर्ड सर्वत्र झळकतात. परंतु, प्रत्यक्षात मात्र बहुतांश पेट्रोल डिझेल पंपांवर शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, याशिवाय स्वच्छतागृह सुविधांचा अभाव असून पूर्णपणे बोजवारा उडालेला दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!