Tuesday, April 23, 2024
Homeजळगाव22 राज्यांत बौद्ध धम्माचे कार्य – अ‍ॅड.भीमराव आंबेडकर

22 राज्यांत बौद्ध धम्माचे कार्य – अ‍ॅड.भीमराव आंबेडकर

जळगाव  –

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून देशातील 22 राज्यात धम्माचे कार्य सुरू आहे. श्रामनेर शिबिर, धम्म संमेलन, परिषदा भरविल्या जातात. दि.14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी नागपूर येथे बौद्धधम्माची दीक्षा घेतली, त्यांनीच बौद्धमहासभेची स्थापना केली. त्यानंतर यशवंतराव आंबेडकर, मीराताई आंबेडकर व मी महासभेचे काम करत आहे, अशी माहिती बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अ‍ॅड.भीमराव आंबेडकर यांनी ‘देशदूत फेसबुक लाईव्ह’ गप्पांमध्ये दिली.

- Advertisement -

दलित लेखक जयसिंग वाघ, डॉ.मिलिंद बागुल, महासभेचे राज्याचे अध्यक्ष बोराडे, राष्ट्रीय सरचिटणीस गवई, के.वाय.सुरवाडे, सुभाष सपकाळे, डॉ.अनिल शिरसाळे आदी यावेळी उपस्थित होते.
ज्यावेळी बाबासाहेबांनी धर्मांतर केले त्यावेळी त्यांच्या समवेत फक्त महार समाज होता.

पण आता इतर समाजामध्ये वैचारिक परिवर्तन होऊन त्यांनीही बौद्ध धम्म स्वीकारला आहे. मध्य प्रदेशातील कुशवाह समाज, बिहारमधील बोरीया समाज तसेच गुजरातमधील कोलिया किंवा कोळी समाजात वैचारिक परिवर्तन झाले आहे. आगामी पाच-सहा वर्षात फार मोठे धार्मिक परिवर्तन झाल्याचे चित्र दिसेल असे आंबेडकर यांनी सांगितले.

जयसिंग वाघ यांनी सरकारी पातळीवर आंतराष्ट्रीय परिषदेत गैरबौध्येतर मंडळी चुकीचा धम्म मांडतात काही तथाकथित बोगस फिलॉसॉफर धम्म कार्यात हस्तक्षेप करतात, बाबासाहेबांनी धम्माच्या र्‍हासाची 16 करणे सांगितली आहेत.

महासभेच्या माध्यमातून यावर काही केले जाते का? असे विचारले असता अ‍ॅड.भीमराव आंबेडकर म्हणाले की याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे, दर दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर परिषदा होतात त्यात काही गैर बौध्येतर मंडळी, सरकारी अधिकारी व काही राजकीय मंडळी तेथे जातात, एखादा शोधनिबंध सादर करतात पण त्यांचा उद्देश सहलीचा असतो. देशातील रजिस्टर संस्थांना दुय्यम प्रतिनिधित्व दिले जाते.

जगातील बौध्दिस्ट देशातून भारतात बुद्धाच्या भूमीत पर्यटनासाठी येतात त्यामुळे देशाला फार मोठे परकीय चलनाच्या माध्यमातून उत्पन्न मिळते पण त्या पर्यटन स्थळावर पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. हे खेदाने नमूद करावे लागते असे भीमराव आंबेडकर म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या