Type to search

ट्रॅक्टरचे टायर फुटून ट्रॉली उलटल्याने चालकासह 7 मजूर गंभीर जखमी

maharashtra जळगाव

ट्रॅक्टरचे टायर फुटून ट्रॉली उलटल्याने चालकासह 7 मजूर गंभीर जखमी

Share
जळगाव । राष्ट्रीय महामार्गावरील आहुजानगरपासून काही अंतरावर ट्रॅक्टरचे पुढील टायर फुटल्याने ट्राली उलटून चालकासह 7 मजूर जखमी झाल्याची झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे महामार्गावर अर्धातास वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्याच्याकडेला असलेल्या 15 फूट खाली ट्रॅक्टर उलटून पडल्याने चालकासह एका मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमी सर्व मजूरांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तालुक्यातील दापोरा व शिरसोली येथून बांभोरी येथील जैन कंपनीत फायबरच्या प्लेटा घेण्यासाठी एमव्हीडी 9749 क्रमांकाचे ट्रॅक्टर राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. यावेळी ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीमध्ये मजूर देखील बसले होते. अचानक राष्ट्रीय महामार्गावरील आहुजा नगरपासून काही अंतरावर ट्रॅक्टरच्या डाव्या बाजूचे टायर अचानक फुटल्याने ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याच्याकडेला उलटल्याने चालकासह ट्रॉलीतील सहा मजूर जखमी झाले. या घटनेमुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दूरदूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जखमींना तात्काळ लगेचच खाजगी वाहनांमधून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच जखमींच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली.

जखमींना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात हलविले
या अपघातात ट्रॅक्टरचालक देविदास देवराम जावरे वय 58 रा. जळगाव, यांच्यासह दिपक मुरलीधर वराडे वय 28 रा. शिरसोली, दगडू सुपडू कदम वय 40, रामकृष्णा बुधा तांदळे, संतोष रामदास मराठे वय 45, नितीन श्रीधर सुरवाडे वय 30, सुदर्शन शेषराव लहाने वय 40 रा. सर्व दापोरा हे गंभीर जखमी झाले. नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दोघांची प्रकृती चिंताजनक
ट्रॉली उलटल्याने झालेल्या अपघातात चालक देविदास देवराम जावरे, संतोष रामदास मराठे या दोघांच्या डोक्याला व हात पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना लगेचच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच जैन कंपनीच्या अधिकार्‍यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेवून सर्वच जखमींना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

बस खराब झाल्याने वाहतूक खोळंबली
अपघातावेळी महामार्गावर काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. याचवेळी शिर्डी कडून भुसावळकडे येणारी एमएच 20 बी 2992 ही बस बंद पडल्याने बर्‍याचवेळ यामार्गावर वाहतूक खोळंबली होती. शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी याठिकाणी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!