Saturday, April 27, 2024
Homeजळगावभरधाव ट्रकची डंपरला धडक : डंपरचालक ठार

भरधाव ट्रकची डंपरला धडक : डंपरचालक ठार

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

एकेरी रस्त्यावर भरधाव राँग साईड येणार्‍या ट्रकने समोरुन येणार्‍या डंपरला जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास जळगाव खुर्द शिवारातील मुंजोबा मंदिरासमोर घडली.

- Advertisement -

या अपघातात डंपरचालक देवानंद नथ्थू पाटील (वय 35) रा. साकेगाव ता. भुसावळ यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील देवानंद नथ्थू पाटील व क्लिनर विकास युवराज तायडे हे दोघ (एमएच 19 झेड 2113) हे भुसावळकडून जळगावकडे येेत होते.

यावेळी जळगाव खुर्द शिवारातील मुंजोबा मंदिरासमोरील एकेरी रस्त्यावरुन समोरुन (एमएच 18 बीए 4188) क्रमांकाचा ट्रक राँग साईडने भरधाव वेगाने येत होता.

दरम्यान समोरुन येणार्‍या ट्रकने डंपरला जोरदार धडक दिली. यात डंपरचालक देवानंद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनर विकास पाटील याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघात घडताच ट्रक चालक घटनास्थळून पसार झाला असून त्याचयाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या