Tuesday, April 23, 2024
Homeजळगावलिफ्ट देणार्‍या ‘त्या’ तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

लिफ्ट देणार्‍या ‘त्या’ तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

रेमंड कंपनीत जाण्यार्‍या तरुणाला लिफ्ट मागून त्याच्यासोबत जाणार्‍या दुचाकीला भरधाव येणार्‍या वाळूच्या डंपरने जोरदार धडक दिली.

- Advertisement -

या अपघातात लिफ्ट मागणार्‍या प्रौढाचा जागीच मृत्यू झाला होता तर अक्षय विजय पाटील (वय 35) हा दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला होता.

त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना गुरुवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

सिंधी कॉलनी परिसरातील डॉ. आंबेडकर वस्तीगृहाजवळील रहिवासी सिद्धार्थ त्र्यंबक मोरे व चंदुअण्णानगरातील रहिवासी अक्षय विजय पाटील हे दोघ रेमंड कंपनीत नोकरीस होते.

9 मार्च रोजी अक्षय पाटील हा त्याच्या एमएच 19 सीएल 6777 क्रमांकाच्या मोटारसायकलने कंपनीत जात होता.

दरम्यान सिंधी कॉलनीजवळ सिद्धार्थ मोरे यांनी त्याला हात दाखवित कंपनीत जाण्यासाठी लिफ्ट मागितली.

अक्षयने त्यांना लिफ्ट देत तो ईच्छादेवी चौफुलीच्या दिशेने जात असतांना मागून भरधाव येणार्‍या एमपी 04 जीएए 3492 क्रमांकाच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली.

मनहेलावणारा आक्रोश

अक्षयचे लहानपणीच पितृछत्र हरपल्याने तो घरात एकटा कमावता होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. त्याच्या पश्चात आई, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.

10 दिवसांपासून मृत्यूशी झुंज

या अपघातात सिद्धार्थ मोरे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर अक्षयच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अक्षयच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्याव शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने तो गेल्या दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता अखेर आज उपचार सुरु असतांना त्याची झुंज अपयशी ठरली आणि त्याची आज सकाळी प्राणज्योत मालवली.

डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी डंपचालक धीरज मोहन धनगर (वय 18, रा. कडगाव, ता. जळगाव) याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या