Friday, April 26, 2024
Homeजळगावदुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील ईदगाह कॉम्प्लेक्स समोरच भंगारबाजारा जवळ रस्त्याच्या बाजुला उभा असलेल्या तरुणाला सुसाट दुचाकीस्वाराने धडक दिल्याने तो, चेंडूसारखा हवेत उडून डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालय व तेथून खासगी ट्रॉमासेंटरला हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

आधारसेवा केंद्र चालक मोहम्मद खालीद सुरुर अहमद(वय-३०,रा. मारुळ) व त्याचा मित्र सैय्यद नाजिश मोहम्मद सिद्दीकी (वय-३४ असे दोघ गुरुवार (ता.११) रोजी अडीच वाजता जेवणानंतर इदगाह कब्रस्थान समोरील भंगार बाजारा जवळ उभे होते.

त्यांच्या दुचाकीच्या दुरुस्तीचे कामासाठी उभे असतांना नेरीनागा स्मशान भुमीकडून सुसाट वेगात (एमएच.१९.डीएम.४५२) अजिंठा चौकाकडे जाणार्‍या सुसाट दुचाकीने मोहम्मद खालीद अहमद याला धडक दिली.

धडक इतकी जबर होती की, रस्त्यावर उभा मोहम्मद खाली द अक्षरशः चेंडू सारखा हवेत उसळून डोक्यावर खाली पडल्याने गंभीर जखमी झाला.

सैय्यद नाजीश मोहम्मद सिद्दीकी याने मित्राला उचलत बाजुला बसवले, तसेच अपघाताला कारणीभुत वाहन चालकालाही उचलून बाजुला केले. जखमीला तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, प्रकृती चिंताजनक असल्याने मोहम्मद खालीद यास खासगी ट्रॉमा सेंटरला दाखल करण्यात आले असुन प्रकृती चिंता जनक असुन अपघातग्रस्त वाहन चालका विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या