भुसावळ येथे स्कॉर्पियो उलटून चौघे जखमी

0
भुसावळ । येथील जामनेर रोडवर कृष्णा नगरसमोर कार रेसिंगच्या प्रयत्नात भरधाव स्कॉर्पिओच्या चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने चारचाकी दुभाजकार आदळून उलटून तीघे जखमी तर जवळच्या तीन दुकानांचे नुकसान झाल्याची घटना दि.14 रोजी पहाटे 1 वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशीरा हॉटेलवर जेवन आटोपून मित्रांनी दोन्ही कारची रेस लावली होती. दोनही चारचाकी नाहाटा चौफुलीकडून शहरात भरधाव वेगात येत होत्या त्यातील स्कॉर्पियो एमएच 05 सीएच 9001 ही चारचाकी दि.14 रोजी पहाटे 1 वाजेच्या सुमारास शहरातील शनि मंदीरासमोरील दुभाजकावर आदळूल चारचाकीने तीन पलटली घेतल्या. यात अपघातात चारचाकीतील गौरव अनिल मनवाणी (चालक), गौरव गोपीचंद लुल्ला,

निखिल रत्नानी (दोघे रा. भुसावळ), समित रायकंद राणे (मुंबई) हे चारही जण जखमी झाले. या अपघातात चारचाकी पलटी होवून कृष्णानगरच्या फलकाजवळील प्रभाकर मोतीराम जावळे यांची पानटपरी, विलास काशिनाथ जाधव यांचे महाराष्ट्र चिकन सेंटर, शरद देवरे यांचे गजानन फर्निचर व रमेश मुलचंद कोठारी यांच्या ढेपच्या दुकानाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक पिंटु कोठारी यांनी घटनास्थळी पोहचून तात्काळ पोलिसांना माहिती दिली.व जखमींना उपचारासाठी जवळच्या सोनिच्छा हॉस्पिटीलमध्ये दाखल करण्यात आले. जखमींध्ये एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरु आहे. सांगण्यात आले.सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने या रस्त्यावर अथवा फुटपाथवर कोणीच नसल्याने जीवित हाणी झाली नाही.

कार रेसिंगचा प्रयत्न – महागड्या चारचाकीतून जाणार्‍या मित्रांनी जामनेर रोडवर कार रेसिंग खेळण्याचा प्रयत्न केला. यात दुसर्‍या गाडीच्या पुढे निघण्याच्या नादात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दुभाजकावरुन चारचाकी पलटी होवून अपघात झाल्याची चर्चा परिसरात आहे.

याबाबत बाजार पेठ पोलिसात रिक्षाचालक विलास काशीनाथ जाधव (रा. कृष्णा नगर, भुसावळ) यांच्या खबरी वरुन 03/18 प्रमाणे अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.काँ. सैय्यद मो. अली करीत आहे.

LEAVE A REPLY

*