Type to search

maharashtra जळगाव

घातवार : अपघातात पाच ठार; दोघांची आत्महत्त्या

Share
मलकापूर/मुक्ताईनगर । मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली(घोडसगाव) नजीक नॅशनल हायवे क्रमांक सहावर दि. 12 रोजी दुपारी 4 वाजेदरम्यान भरधाव ट्रकने अ‍ॅटोला दिलेल्या जबर धडकेत अ‍ॅटोचालक व अ‍ॅटोतील प्रवासी महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली.

मलकापुर तालुक्यातील दसरखेड येथील विनोद कुंदनलाल जैस्वाल (वय 50) हे त्यांची अ‍ॅटोरिक्षा क्रमांक एमएच 28 टी 3602 ने प्रवासी घेवुन मुक्ताईनगरकडून दसरखेडला येत असतांना मलकापुरकडून जळगाव(खा)कडे जाणार्‍या ट्रक क्रमांक एमपी 14 एलबी 2277 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अ‍ॅटोला जबर धडक दिली. या धडकेत अ‍ॅटोचालक विनोद कुंदनलाल जैस्वाल (वय 50 रा.दसरखेड) व रेखाबाई पाचपोळ (रा.वाघोळा) हे दोघे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताबरोबर शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे, नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात प्रकरणी मुक्ताईनगर पो.स्टे.मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

नशिराबाद-साकेगाव दरम्यान ट्रॅव्हल्स्- ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू
जळगाव । राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद-साकेगाव दरम्यान असलेल्या कपूर पेट्रोलपंपाजवळ खाजगी ट्रॅव्हल्स्-ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ट्रक व ट्रॅव्हल्स्वरील चालकाचा तर कॅबीनमध्ये झोपलेल्या एकाचा मृत्यू झाला. तर अपघातात जवळपास 13 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय व खाजागी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना दि .11 च्या रात्री 1.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामुळे महामार्गावर जवळपास पहाटे 4 वाजेपर्यंत वाहतुक विस्कळीत झाली होती.

पाईपाने भरला जीजे 12 व्हीटी 2599 हा ट्रक अमरावतीकडे जात होता. तर जीजे 19 एक्स 9596 ही खाजगी ट्रॅव्हल्स् बस यवतमाळ येथून सुरत येथे जात होती. या ट्रॅव्हल्स्मध्ये जवळपास 40 प्रवासी होते. नाशिराबाद पासून काही अंतरावर असलेल्या कपूर पेट्रोलपंपामध्ये अमरावतीकडे जाणारा ट्रक डिझेल भरण्यास जात असतांना अचानक भरधाव वेगात आलेली ट्रॅव्हल्स् ट्रकवर धडकली. या भीषण अपघातात ट्रक व ट्रॅव्हल्स्च्या कॅबीनचा पूर्णपणे चुराडा झाला. ट्रकचालक राजुराम गेणाराम चौधरी वय 23 रा. बावडीकल्ला ता. चोटण, जिल्हा बाढमेर राजस्थान व ट्रॅव्हल्स्च्या कॅबीनमध्ये झोपलेले निर्भयासिंह प्रतापसिंह पवार वय 39 रा प्लासिया ता. जाडोल. जिल्हा. उदयपूर राजस्थान या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅव्हल्स् चालक शंकर पटेल (पूर्ण नाव माहित नाही) रा. यवतमाळ यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तिघांच्या कुटुंबियांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. ट्रकचालम मयत राजुराम चौधरी यांच्या ट्रकच्या मागे त्याच्याच मालकाची दुसरी ट्रक असल्याने त्याची चालकाने त्याची ओळख पटवून ट्रकमालकाला व त्याच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमीवर जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचार
अपघातात ट्रॅव्हल्स्मधील जखमी झालेले विनोद भिकाजी राठोड वय 35, राधा विनोद राठोड, पुजा विनोद राठोड, पुजा विनोद राठोड रा. सर्व भांबोरा, ता. घटजी, जिल्हा. यवतमाळ, नारायण विनायक तांबोळे वय 45 रा. यवतमाळ, संतोष अग्रवाल, गजानन चावक रा. दिग्रस ता. यवतमाळ, शंकर रामजी राठोड वय 38, संदीप गजानना वाघोउे वय 32 रा. अकोला, गजानन बोरकर वय 70, कविता शंकर राठोड वय 42 व ट्रॅव्हल्स् वरील वाहक अतिष पवार हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर इतर जखमींना नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांची माहिती मिळू शकली नव्हती.

पहाटे 4 वाजेपर्यंत वाहतूक विस्कळीत
ट्रक-ट्रॅव्हल्स्च्या अपघातामुळे महामार्गावर जवळपास पहाटे 4 वाजेपर्यंत वाहतुक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती कळताच नाशिराबाद पोलिस स्टेशनचे सपोनि सचिन बागुल, पोलिस उपनिरीक्षक गणेश हिवरकर, पोकॉ. राजु सांळुखे, किरण बाविस्कर , संतोष इदा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने जखमींना खाजगी रुग्णालय व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या अपघाताबाबत मंगळवारी दुपारी उशिरापर्यंत नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

टोळी येथे शेतकर्‍याची आत्महत्या
पारोळा । तालुक्यातील टोळी येथील शेतकरी सर्जेराव मन्साराम पाटील (52) वर्षे यांनी दि. 4 रोजी सायंकाळी गावाजवळील बोरीनदीपात्रात विषारी किटकनाशक फवारणीचे औषध सेवन करुन जागेवरच पडलेले असतांना गावातील काही तरुणांनी त्यांना उचलून घरी आणले व तात्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेथुन त्यांना धुळे येथील सिव्हिल हाँस्पिटलला दाखल करण्यात आले होते, त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते त्यातच दि. 12 रोजी सकाळी 8 वाजता त्याचे निधन झाले. त्याची शेती त्यांच्या वयोवृध्द आई मथुराबाई मन्साराम पाटील यांच्या नावे दिड एकर शेती असुन त्या शेतीवर त्यांनी बँक आँफ महाराष्ट्र शाखा-पारोळा या बँकेकडून साधारण 1ते 1.50 लाख रुपये पिक कर्ज व ठिबकसाठी शेती कर्ज घेतले असुन त्यांच्यावर हात उसनवारीचे देखिल कर्ज होते, या कर्जाच्या नेहमी ते घरात विचार करत होते, त्यातच या वर्षी शेतात पाहीजे तसे उत्पन्न न मिळाल्याने त्यांनी ही टोकाची भुमिका घेतली असावी. असे बोलले जात आहे, यात गावातील अतिशय कष्टाळु कुंटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे .त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सुन असा परीवार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!