भरधाव ट्रकची कारला धडक

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-राष्ट्रीय महामार्गावरील अशोक लिलाँडजवळ भरधाव ट्रकवरील चालकांने कारला धडक दिल्याची घटना दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारचे नुकसान झाले असून कार चालक बालबाल बचावला आहे.
याबाबत कार चालकाने दिलेली माहिती अशी की, भुसावळ येथील शांतीनगर मधील रहिवाशी स्केटर्ल्ड स्टुवर्ट व त्यांचा मुलगा ब्रेट स्टुवर्ट हे दोघे जळगाव येथे नवीन कार घेण्यासाठी आले होते.

त्यांनी होन्डा शोरूममधून डब्ल्यु आर होन्डा सिटी ही कार घेतली. ही नवीन गाडी घेवून दोघे भुसावळ येथे घरी जात असतांना मागून भरधाव येणार्‍या एच आर 66 ए 8536 या ट्रकवरील मद्यपी चालकांने त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली.

या धडकेत दोघे पिता-पुत्र बचावले असून नव्या गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
अपघातानंतर ब्रेट स्टुवर्ट यांने ट्रकचालकाला पकडले. यावेळी ट्रकचालक गोंविद सिंग वय 37 रा रखवरीया उत्तरप्रदेश यांने स्टुवर्टच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.

यावेळी नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर ट्रकसह चालकाला एमआयडीसी पोलिसात आणण्यात आले होते.

 

 

LEAVE A REPLY

*