Type to search

जळगाव

मानराज पार्कजवळ एसटी बसवर भरधाव कार धडकली

Share

जळगाव । राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क जवळ धुळ्याकडून जळगावकडे येणार्‍या बसवर समोरुन भरधाव वेगात आलेली कार धडकल्याची घटना शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारचालकाला दुखापत झाली असून त्याला उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणेश गजानन शिरसाठ वय 30 रा. मोहन नगर असे जखमीचे नाव आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, धुळ्यावरून जळगावकडे येणारी एमएच 20 बीएच 3363 क्रमांकाच्या बसवर मानराज पार्कजवळ समोरुन भरधाव वेगात आलेली एमएच 31 बीबी 9405 ही कार धडकली. कारच्या पुढील बाजूचे नुकसान होवून काच फुटल्याने चालक गणेश शिरसाठ याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. या अपघातानंतर महामार्गावर काहीशी वाहतुक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती कळताच रामानंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, सुहास राऊत यांच्याह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान कारचालक दारुच्या नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

कारचालकाने शिवकॉलनीजवळ एका ट्रकला व मोटारसायकलस्वाराला कट मारल्या असल्याचे काही वाहनधारकांनी सांगितले. बसमध्ये जवळपास 48 प्रवासी होते. अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे चालक डी.एन.महाजन व वाहक प्रशांत मोराणकर यांनी सांगितले. त्यानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने जिल्हापेठ पोलिसात आणण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीसात कुठलीही नोंद नव्हती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!