Type to search

जळगाव

कोरपावलीत बसने बालिकेला चिरडले

Share

यावल । तालुक्यातील कोरपावली येथे बसस्थानकावर चार वर्षीय मुलगी बसच्या मागील चाकाखाली येऊन चिरडल्याने ती जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली

रागिनी समाधान मरसाळे हि एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथील रहिवासी असून मामा किरण संतोष निकाळजे यांचे कोरपावली येथील घरी आईसह आलेली होती. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास यावल ही बस कोरपावली मार्गे मोहराळे येथे बस क्रमांक (एम एच 20 बीएल 09 5 3) या बस जात असतांना बसच्या मागील चाकात सापडल्याने ती जागीच ठार झाली आहे.

या प्रकरणी मामा किरण निकाळजे यांच्या फिर्यादी वरून अपघाताचा गुन्हा येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. किरण संतोष निकाळजे यांच्या फिर्यादीवरून बसचालक चालक शिवाजी पंडित पाटील रा.बोरोले नगर यावल यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे. बसचालक शिवाजी पाटील यावल डेपो हे स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाले आहे. बालीका रागिनी मरसाळे हिचा यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉ. फिरोज तडवी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!