शाळांमध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा

0
जळगाव । दि.3 । प्रतिनिधी-आषाढी एकादशीनिमित्त शहरातील शाळांमध्ये विठ्ठल नामाच्या जलघोषात दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषा साकारली होती.

बी.यु.एन. रायसोनी स्कुल
बी.यु.एन. रायसोनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला होता. याप्रसंगी वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुख्मिनी इतर संतांचा वेशभुषा परिधान केल्या होत्या. तसेच टाळ-मृदूंग वीणा तसेच विठ्ठल नामाच्या गजरात शाळेच्या आवारापासून ते जवळच्या विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. दिंडी व पालखीची पुजा संस्थेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, मुख्याध्यापक मनोज शिरोळे, नेहा पोतदार, योगिता सोनजे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी आषाढी एकादशीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.

प.न.लुंकड कन्या शाळा
आषाढी एकादशी निमित्त प.न.लुंकड कन्याशाळेत कार्यानुभव व पर्यावरण विभागातर्फे दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीत इ.5 वी ते 7 वी च्या विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी विद्यार्थीनींनी विठ्ठल रुख्मिणी तसेच संतांच्या वेशभूषा परिधान करुन त्यांच्या डोक्यावर तुळशी वृक्षवने घेवून ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’च्या गजरात दिंडी ज्ञानेश्वर मंदिरात समाप्ती करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आरती व प्रसादाचे वाटप करण्यात आले. दिंडीत पर्यावरणरक्षण व पर्यावरण जागृतीचा संदेश पोस्टरद्वारे देण्यात आला. परिसरातील नागरिकांनीही दिंडीला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. याप्रसंगी सामाजिक पर्यावरण विभागाचे विजय शेलार यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पद्मजा अत्रे, रेवती शेंदुर्णीकर, मुख्याध्यापिका साधना भालेराव, पर्यवेक्षक गणेश महाजन उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अंजली कुलकर्णी, पर्यावरण विभागप्रमुख अजयकुमार सोनवणे, उपप्रमुख के.एन.चौधरी यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

आर.आर.विद्यालय
ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात वारकरी विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा तयार केला व शाळेत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. आषाढी एकादशी निमित्त पुर्वसंध्येला हा सोहळा आयोजित आर.आर.विद्यालयात पार पडला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल माऊलीच्या गजरात फुगडी, लंगडी, पावरी यासह रिंगण सोहळा सादर केला. तुलसी वृंदावन, कलशधारी मुली, भगवे झेंडेधारी व आकर्षक फुगड्यांनी रिंगण सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, खेळ मांडीयेला वाळवंटी दारी, नाचती वैष्णव ठायी रे, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, टाळ वाजे, वीणा वाजे आदी विठ्ठलाच्या गीतांनी वातावरण भक्तीमय झाले होते. या सोहळ्यातून भक्तीमार्गाचा, शांततेचा व पर्यावरणाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला गेला. याप्रसंगी मुख्याध्यापक डी.एस.सरोदे, उपमुख्याध्यापिका विजया काबरा, पर्यवेक्षक एस.बी.अत्तरदे, आर.एम.झवर, आर.एस.सोनवणे, डी.टी.पाटील, व्ही.एस.रोकडे, संजय क्षीरसागर, संजय पिले, एस.डी.पाटील, द्वारकाधीश जोशी, ए.एन.सपकाळे, बी.ए.पानपाटील यांनी परिश्रम घेतले.

डॉ.अविनाश आचार्य विद्यालय
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालयातील, पूर्व प्राथमिक विभागात विठ्ठल नामाचा गजर करुन चिमुकल्यांचा दिंडी सोहळा रंगला. आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. मुख्याध्यापिका कल्पना बावस्कर, रोहिणी कुळकर्णी यांच्यासह उपस्थित पालकांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रम प्रमुख ज्योत्स्ना हिवराळे यांनी संतांची माहिती सांगितली. तसेच ‘मुक्ताईने संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर पोळ्या भाजल्या ही नाटीका सादर करण्यात आली. सुयोग कॉलनी परिसरात दिंडी काढण्यात आली. दिंडीत संतांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते. विठ्ठल नामाचा गजर करत विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला. प्रति पंढरपूरची प्रचिती येवून सर्वच भक्तीमय वातावरण निर्माण झाली होते. दिंडीत विद्यार्थ्यांसह शिक्षक-पालक कर्मचारी सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या पुर्वसंध्येला शाळेच्या मैदानावर दिंडी व रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आदित्य दलाल या विद्यार्थ्यांने संत ज्ञानेश्वराची वेशभुषा धारण करुन घोड्यावर स्वार झाला होता. तर विद्यार्थीनींनी कलश व वृंदावन घेवून सहभागी झाले होते. त्यानंतर गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यामंदिराचे इ.3 री व 4 थीचे विद्यार्थी पालखी व टाळ घेवून सहभागी झाले. विठ्ठल रुख्माईच्या प्रतिमेचे पूजन के.जी.फेगडे, मुख्याध्यापक दिलीप चौधरी, उषा नेमाडे, मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी पूजन केले. परिसरातील विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी नेण्यात आली. त्यानंतर सी.बी.कोळी, योगेश भालेराव यांनी भजन म्हणून मंत्रमुग्ध केले. यशस्वीतेसाठी सतिश भोळे, डी.ए.पाटील, सुनिल बावस्कर, आर.एन.तडवी, प्रणिता झांबरे, एम.एन.भंगाळे, सुचिता शिरसाठे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

सद्गुरु विद्यालय
सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विद्या मंदिर खेडी बु॥ येथे आषाढी एकादशीनिमित्त खेडी परिसरातून दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकारामाचा जयघोष केला. तसेच विद्यार्थ्यांनी वारकरी सांप्रदायीची वेशभूषा परिधान करुन दिंडीत सहभागी झाले होते. याप्रसंगी उपशिक्षक गणेश तोडते, लिलाधर नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व सांगितले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका गायत्री भंगाळे यांचे मार्गदर्शन लाभले. भुषण जोगी, जावेद तडवी, सोपान पाटील, शिल्पा झोपे, पुनम चौधरी, ज्योती महाले, सविता चव्हाण, प्रमोद चौधरी यांनी परिश्रम घेतले.
रायसोनी इंग्लिश मिडीयम स्कुल
बी.यु.एन.रायसोनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्री-प्रायमरी, प्रायमरी माध्यमातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुखमाईची वेशभूषा करुन टाळा मृदुंगच्या गजरात आणि डोक्यावर तुळस घेवून अयोध्यानगर परिसरात दिंडी काढली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे अभंग, हरीपाठ सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक विठ्ठल पाटील, नलिनी शर्मा यांनी केले.

विद्या इंग्लिश मिडीयम हायस्कुल
आषाढी एकादशी निमित्त विद्या इंग्लिश मिडीयम स्कुलतर्फे प्री-प्रायमरी विभागाच्या विद्यार्थ्यांची पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये नर्सरी ज्युनियर के.जी. व सिनियर के.जी.च्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी संतांच्या व वारकर्‍यांची वेशभुषा परिधान केले होते. पालखीचे पूजन अ‍ॅडमिनिस्ट्रेटर कामिनी भट, हॅरी जॉन यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

श्रवण विकास मंदिर कर्णबधीर विद्यालय
येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित, ‘श्रवण विकास मंदिर’ या कर्णबधीर विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्या दिव्यांग वारकरी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक वृंदाने वारीचा-दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक पद्माकर इंगळे यांनी पालखीचे पूजन केले. अंश मोरे याने विठ्ठलाची तर वेदिका सोनार हिने रुख्मिणीची वेशभूषा साकारली होती.

 

 

LEAVE A REPLY

*