अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी

सध्या सोनोग्राफी तपासणीचे प्रस्थ खूपच (थोडे आवश्यकतेपेक्षा जास्तच) आहे. पण तरीही ही खूप उपयोगाची तपासणी आहे.

* गर्भाशय, ओव्हरी, पोटातील किडनी, लिव्हर वगैरे ऑर्गन्स नेहमीच्या आकाराचे व नॉर्मल आहेत किंवा नाही याचा अंदाज सोनोग्राफीवरून करता येतो. त्यामुळे बर्‍याचदा सुरुवातीला ही तपासणी करून घेऊन पुढे उपचार चालू केल्यास फायदा होतो.

* सोनोग्राफीचा मुख्य उपयोग, दर महिन्याला स्त्रीच्या ओव्हरीमध्ये स्त्रीबीज निर्माण होत आहे किंवा नाही, स्त्रीबीजाची वाढ होते आहे का नाही आणि प्रत्यक्ष ओव्ह्युलेशन कधी होते. त्या दिवसाची, ओव्ह्युलेशन स्कॅनवरून माहिती मिळू शकते व ही खूपच उपयोगी असते.

स्त्रीबीज तयारच होत नसेल तर ते तयार होण्यासाठी हार्मोन्सच्या गोळ्या किंवा इंजेक्शनस् देता येतात. स्त्रीबीज बाहेर पडण्याचा दिवस सांगता येतो व त्या दिवशी नवरा-बायकोचे संबंध आल्यास दिवस राहण्याची शक्यता खूप वाढलेली असते.

मात्र अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी ओव्ह्युलेशन किंवा गर्भाशय पहाताना सगळ्यात कंटाळवाणा भाग म्हणजे तपासणीपूर्वी 2 तास खूप पाणी पिणे व त्यानंतर लघवीला न जाणे (लघवीची पिशवी भरली की गर्भाशय दिसणे सोईचे होते) ही कळ काढणे खरोखरच फारच अवघड असते. ऑव्ह्युलेशन स्कॅन दिवस राहीपर्यंत दर महिन्याला करणे उपयोगाचे असते.

डॉ नितीन लाड
डॉ नेहा लाड

पोस्ट कॉयटल टेस्ट (हनर्स टेस्ट)
पतीचे सिमेन (धातू) नॉर्मल असले तरी जेव्हा पती-पत्नीत संबंध येतो. तेव्हा स्त्रीच्या व्हजायनात हे शुक्रजंतू असणारे वीर्य टाकले जाते. त्यामध्ये व्हजायना व गर्भाशयाच्या तोंडाचा (सर्व्हिक्सचा) स्त्राव व शुक्रजंतू एकत्र मिसळतात.

नैसर्गिकपणे शुक्रजंतू या स्त्रावामुळे जास्त चपळ होऊन गर्भाशयात जावेत असा उद्देश असतो. काही वेळा मात्र उलट होते. शुक्रजंतूंची अ‍ॅक्टीव्हिटी सर्व्हिक्स/ व्हजायनाच्या स्त्रावात मिसळल्यावर अतिशय कमी होते किंवा शुक्रजंतू पूर्णपणे मरूनच जातात व दिवस राहत नाहीत. यासाठी ही तपासणी करतात.

पुष्कळदा पुरुषांना मानसिक ताणामुळे धातू तपासण्यास देणे शक्य नसते. तेव्हाही या तपासणीचा उपयोग होतो. नवरा-बायकोत घरी संबंध आल्यावर, पत्नी तपासण्यासाठी 2 तासांच्या आत हॉस्पिटलला येते.

तेथे काचेच्या स्लाईडवर हा व्हजायनातील स्त्राव घेतात. तो लगेच पॅथॉलॅजिस्टकडून मायक्रोस्कोपखाली तपासणी किती शुक्रजंतू आहेत, त्यांची हालचाल कशी आहे का ते मेलेले आहेत (किंवा अजिबात शुक्रजंतूच नाहीत ते) पाहिले जाते.

LEAVE A REPLY

*