प्रोलोथेरपीने वेदना शमवा

0
वैद्यकीशास्त्रात नवनवीन संशोधन व तंत्रमान विकसित होत आहे. प्रोलोथेरपी हा त्यापैकीच एक. 1993 पासून यावर संशोधन सुरू आहे. डॉ. जॉर्ज हॅकेट यांनी 1950 साली पहिल्यांदा प्रोलोथेरपी केली.
तसेच डॉ. हॅमवॉल हे मॉडर्न प्रोलोथेरपी म्हणजे काया, तर शरीराच्या नैसर्गिकरित्या जखम भरण्याच्या प्रक्रियेस उत्तेजित करणारी थेरपी म्हणजे प्रोलोथेरपी.
या थेरपीद्वारे इजा झालेल्या अवयवामध्ये रिजनरेशन व रिपेअर घडविले जाते. प्रोलोथेरपी का केली जाते. शरीरातील मुख्यत: स्नायूंच्या दोर्‍यां व सांध्यातील गादी व सांध्याच्या आवरणासाठी प्रोलोथेरपी केली जाते.

या भागांना झालेली दुखापत भरून निघणे अवघड असते. कारण त्या सर्वांना प्रत्यक्षरित्या रक्त पुरवठा नसतो. रक्तातील प्राथमिक जखम भरणारे घटक तिथे पोहोचू शकत नाही.

हेच घटक प्रालोथेरपी त्या भागांना पोहोचविले जातात. प्रोलोथेरपी कुठल्या रुग्णांसाठी तर कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, टेनिस एल्बो, सरकलेला खांदा, टाचदुखी, कारपल टनेल सिंड्रोम, सांध्यातील गादी फाटणे इत्यादी आजारांवर रुग्णाच्या रक्तातील (पीआरपी) पी.आर.पी.वेगळा केला जातो.

निर्जंतुक पद्धतीने इंजेक्शनद्वारे हा पीआरपी वेदनाग्रस्त भागात सोडला जातो. त्या भागात थोड्या कालावधीसाठी दाह होतो. शरीराच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने तो भाग मजबूत बनतो.

उपचारानंतर घ्यावयाची काळजी हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण रुग्णाचे बरे होणे त्याने घेतलेल्या काळजीवर ठरते. अधिक श्रम व्यायाम करू नये.

प्रवाह कमी करणारी औषधे घेऊ नये. पूर्ण बरे होण्याआधी उपचार थांबवू नये. रुग्णास किती वेळेस उपचार घ्यावे लागतात, तर रुग्णाचा आजार, दुखापत यांच्या तीव्रतेवरून 2 ते 5 वेळेस हे उपचार घ्यावे लागू शकतात. रुग्णास 80 ते 90 टक्क्यांपर्यंत बरे वाटू लागते.

 

LEAVE A REPLY

*