स्त्रियांना दरमहा पाळी येते. त्यानंतर साधारण 13 ते 14 च्या दिवशी ओव्हरीमध्ये स्त्रीबीज तयार होते. त्यासाठी मेंदूतून ‘हायपोथॅलॅमस’ नावाच्या भागाकडून ‘पिट्युटरी’ नावाच्या ग्रंथीकडे व तेथून गर्भाशय, ओव्हरी यांच्याकडे व तसेच उलट सतत संदेश जातात.

हे कार्य शरीरातील स्त्री हार्मोन्सद्वारा होते. त्यासाठी ‘स्त्रीबीज’ नीट किंवा अजिबातच तयारच होत नसेल किंवा शरीरावर इतर हार्मोनल इम्बॅलन्सचे परिणाम दिसत असतील तर रक्ताची तपासणी करून हार्मोन्सची माहिती मिळवता येते.

1) (फॉलीक्यूलर स्टिप्युलेटिंग हार्मोन्स) – एफ.एस.एच.
2) (ल्युटीनाईझिंग हार्मोन्स) – एल. एच.
3) (प्रोलॅक्टीन हार्मोन्स)
4) (थायरॉईड हार्मोन्स) – टी 3/टी 4.

वगैरे हार्मोन्सची तपासणी करून त्यांची रक्तातील पातळी काढता येते. जर एखादे हार्मोन्स कमी असेल तर त्याची इंजेक्शन्स देऊन ‘स्त्री बीज’ तयार करण्यासाठी बाहेरून मदत केली जाते.

क्वचित पी.सी.ओ. डी. (पॉलिसिस्टीक ओव्हेरीयन सिंड्रोम) या ओव्हरीच्या आजारात, स्त्रीबीज बाहेर न पडता, ओव्हरीतच कवच कडक झाल्याने राहते.

डॉ नेहा लाड                             
डॉ नितीन लाड

अशा वेळी पुरुषी हार्मोन्सही प्रमाणाबाहेर वाढतात. त्यामुळे स्त्रीबीज अजिबात बाहेर न पडणे. दाढी-मिश्यांप्रमाणे केस येणे, पुरुषांसारखी राठ त्वचा होणे, वजन प्रमाणाबाहेर वाढणे, वगैरे लक्षणे दिसतात. त्यावेळी एफ.एस.एच.षल.एच. या हार्मोन्सचे एकमेकांशी असणारे प्रमाण पाहून त्याप्रमाणे दुसरे हार्मोन्स देतात.

काही स्त्रियांना पाळी अतिशय अनियमित येते. 3 महिने, 5-6 महिने किंवा कधी कधी अजिबात येतच नसते. अशावेळी दिवस राहण्यासाठी ओव्हरीची क्षमता (स्त्रीबीज) निर्मितीची) आहे किंवा नाही याची माहिती हार्मोन्सच्या प्रमाणावरून कळू शकते.

अगदीच, क्वचित काही बायकांची पाळी खूपच लवकर जाते. (झीशार्रीीींश चशपेर्रिीीश) अशांना पुढे स्वत:चे मूल होणे अशक्यच असते. पण उगाचच वर्षानुवर्षे औषधोपचार घेण्यापेक्षा त्यांना वेळेवर सांगून इतर मार्ग दाखवता येतो.

अशाच प्रकारची पुरुषांच्याही रक्ताची तपासणी करून त्यांच्यात हार्मोन्सची कमतरता आहे किंवा अभाव आहे हे समजते. क्वचित पुरुषांत स्त्री हार्मोन्सचे प्रमाण वाढलेले असते. त्याचीही माहिती कळू शकते.

मात्र सध्यातरी रक्तातल युरिनमधील हार्मोन्सची तपासणी खूपच महाग आहे. त्याचप्रमाणे पुष्कळदा ठामपणे काही माहिती मिळण्याऐवजी ही हार्मोन्स नॉर्मल/अ‍ॅबनॉर्मल यांच्या कुंपणावर असल्यासारखी लेव्हल येते. त्यामुळे दरवेळेसच हार्मोन्स तपासण्याचा फायदा होतोच असे नाही.

स्त्रीबीज तयार करण्यासाठी लागणार्‍या हार्मोन्सच्या इंजेक्शनच्या किमतीही खूप असतात आणि बायकांच्या बाबतीत दिवस राहण्यासाठी एक महिन्यात हार्मोन्सची इंजेक्शन्स् घेऊनही पाळी आली तर हा खर्च पाण्यात जाऊन, पुन्हा इंजेक्शन्स घ्यावी लागतात.

 

LEAVE A REPLY

*