हेअर कंडिशनर

0

केस रखरखीत व कमकुवत असले तर केसांचे संरक्षणासाठी व चांगले दिसण्यासाठी पूर्ण भागावर हेअर कंडिशनर वापरावे. केस प्रभावी, आकर्षक व चमकदार दिसतात. केस धुतल्यानंतर हेअर कंडिशनर 2-3 मिनिटांसाठी लावावे.

काही कंडीशनरला धुण्याची गरज असते. तर काही लावल्यावर तसेच ठेवावयाचे असतात. (लिव्ह ऑन कंडिशनर).
कोंड्याचा त्रास असेल तर वैद्यकीय मात्रेमध्ये बुरशीनाशक (अँटीफंगल) औषधे असलेला (पायरीथायामीन, झिंक, सलेनियम, केटोकोनॅझॉल) मेडीकेटेड शॅम्पू वापरावा.

चांगला फायदा मिळण्याच्या दृष्टिकोनातून या प्रकारच्या शॅम्पूमध्ये केस सुंदर दिसण्यासाठी वापरले जाणारे घटक नसतात. जर हे शॅम्पू वापरून कोंडा व दाह कमी होत नसेल तर डॉक्टरांचे सल्ल्याने काही दिवस उपचार घ्यावेत.

केवळ शॅम्पू, हेअर कंडिशनर, हेअर जेल, हेअर सिरम वापरून केस गळती थांबत नसते. केस गळण्याची कारणे विविध असतात. ठराविक व्यक्तीमध्ये केस गळतीला जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन उपचार घ्यावयाचे असतात.

डॉ प्रमोद महाजन

डोक्यावर कोंडा असल्यास शॅम्पू वापरल्यावर धुवून टाकावयाचे कंडिशनर वापरणे टाळावे. कारण त्यामुळे त्याचा वैद्यकीय प्रभाव कमी होतो.

अशा व्यक्तींनी शॅम्पू व कंडिशनर वेगवेगळी वापरण्याऐवजी शॅम्पू व कंडिशनरची मिश्रण असलेले उत्पादन वापरावे.

जर तुम्हाला डॅन्ड्रफचा/कोंड्याचा त्रास वारंवार होत असेल अथवा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरूनही डॅन्ड्रफचा परत परत त्रास होत असेल तर तज्ज्ञांचे उपचार काही दिवस सुरू ठेवावेत.

अन्यथा डोक्यावरील केसांचे आयुष्य कमी होईल. बहुसंख्य लोक शॅम्पूचा वापर गरजेपेक्षा कमी प्रमाणात अथवा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात करतात.

त्यामुळे शॅम्पूवर पैसे खर्च करूनही फायदा न मिळता उलट केसांची गळती वाढते. डोक्यावरील केस बर्‍याच प्रमाणात गळाल्यानंतर उपचारांचा फायदा पुरेशा प्रमाणात मिळत नाही.

शॅम्पू केसांचे मुळाशी व त्वचेला लावावा. नंतर केसांच्या उर्वरित भागाला लावावा. शॅम्पू केसांमध्ये व्यवस्थित पसरवावा. शॅम्पू घट्ट असल्यास त्यात थोडे पाणी टाकावे.

केसांच्या स्थितीनुसार शॅम्पू 1 ते 12 मिनिटांनी धुवावा. शॅम्पू लावल्यावर केसांवर जोर देऊन मालीश न करता हलक्या हाताने मालीश करावी.

काही लोकांचे केस रोगामुळे अथवा निसर्गत:च कमकुवत झालेले असतात. अशा वेळी शॅम्पू लावल्यावर, मालीश केल्यावर हे केस गळतात.

म्हणून सध्या वापरत असलेला शॅम्पू घट्ट असल्यास त्यात पुरेसे पाणी टाकून वापरावे. जर शॅम्पूला फेस कमी येत असेल तर शॅम्पूचे प्रमाण थोडे वाढवावे.

काही शॅम्पूंना फेस कमी येतो याचा अर्थ असा नव्हे की शॅम्पू कमी प्रभावी आहे. फेस येण्याच्या प्रमाणाचा स्वच्छ होण्याच्या प्रमाणाशी काही संबंध नाही.

पुरेसे पाणी वापरून केसावरील शॅम्पू पूर्ण प्रमाणात धुवावे. नंतर केस नैसर्गिक पणे कोरडे होऊ द्यावे. हेअर ड्रायचा वापर सौम्य प्रमाणात व सौम्यपणे करावा.

 

 

 

LEAVE A REPLY

*