आरोग्यदूत : कान सांभाळा

0

कान मधूनमधून स्वच्छ करणे योग्य नाही. जर कान मधूनमधून स्वच्छ करून घेण्याची गरज वाटत असेल तर कानाची पूर्ण तपासणी करवून घ्या.

गरज नसताना कापूस काडीला लपेटून कान खाजविण्याची सवय योग्य नाही. त्यामुळे पडद्याला इजा होऊन कानात अप्रत्यक्षपणे रोग निर्माण होऊ शकतो.

कान दुखणार्‍या बहिरेपणा वाटणार्‍या अथवा पडदा फाटलेल्या बर्‍याचशा तरुण व मध्यमवयीन रुग्णांमध्ये कानात काडीने अथवा इतर तत्सम वस्तूंनी खाजविल्यामुळे त्रास सुरू झालेला आढळतो.

कान वाहणे ही किरकोळ बाब समजून रोज सकाळी बरेचसे रुग्ण (जसे आपण दात स्वच्छ करतो तसे कान साफ करतात. कानात दुखल्यास अथवा पू वाला वास आल्यास अथवा खाज वाढल्यास हे रोगी डॉक्टरांकडून तात्पुरत्या स्वरुपाचे उपचार करवून घेतात. म्हणजेच अपूर्णपणे उपचार करवून अथवा अज्ञानामुळे दुर्लक्ष करून रुग्ण स्वत:चा रोग अप्रत्यक्षपणे संवर्धित करतात.

अर्भकाला किंवा बालकाला दूध कसे पाजावे व नाक शिंकरून कसे साफ करावे याच्या योग्य पद्धती प्रत्येक आई-वडिलांना माहिती हव्यातच. त्यामुळे तुमच्या बालकाचा बहिरेपणा तुम्ही रोखू शकता.

डॉ प्रमोद महाजन लेसर व कॉस्मेटिक सर्जन (९८२२०५२९०१)

नाक व घशाच्या विकारांमुळे एकूण मुलांपैकी 36% मुलांचे मध्यकर्णात हवेचा दाब आवश्यकतेपेक्षा कमी असतो. अशा मुलांमध्ये मध्यकर्णाचा रोग केव्हाही अथवा वारंवार होण्याची शक्यता असते.

कानातून पू वाहणे, दुखणे अतवा कानात खाज येणे या प्रकारचे विकार असलेल्या 90टक्के बालकांमध्ये त्या सोबतच नाकाचा अथवा गळ्याचा त्रास असतोच.

या बालरुग्णांमध्ये असलेल्या नाकाच्या वा गळ्याच्या त्रासाचे पूर्ण उपचार केल्यास कानाचे रोग फार लवकर दुरुस्त होतात.

LEAVE A REPLY

*