आरोग्यदूत : केस गळती

0
केसांची समस्या सुप्तपणे सुरू होते व ती हळूहळू वाढते. त्यामुळे त्या समस्येकडे व्यक्तीचे फार उशीरा लक्ष जाते. जेव्हा समस्या लक्षात येते तेव्हा ती सौम्य असल्यामुळे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती बळावते.
जेव्हा त्यावर उपचार घेण्याचे मनावर घेतले जाते. तेव्हा बरेचसे लोक जाहिरातीद्वारे माहिती झालेले औषध लावतात व त्याचा फायदा होण्याची वाट पहाण्यात वेळ वाया घालवतात.

समस्येच्या सुरूवातीलाच हा वेळ डॉक्टरांकडून घेतल्या जाणार्‍या प्रभावशाली उपचारांसाठी वापरला गेला तर व्यक्तीला चांगला फायादा मिळतो. पण असे घडताना आढळत नाही.

केसांच्या उपचारांबाबत निराश झालेले व नकारात्मक विचार करणारे यांची लोकसंख्या समाजात फार मोठ्या प्रमाणात आढळते. उपचारांचा फायदा उशीरा होतो.

केस गळण्याच्या समस्यांवर उपचार घेणे म्हणजे 2-4 दिवस सर्दी खोकल्यासाठी औषध घेण्यासारखे निश्चित नाही. सर्दी, खोकला ताप यांचे उपचार घेतल्यावर बहुसंख्य वेळा 2-6 दिवसामध्ये दृश्य फायदा जाणवतो.

डॉ प्रमोद महाजन लेसर व कॉस्मेटिक सर्जन (९८२२०५२९०१)

मात्र केसांचे उपचार घेताना हा फायदा 2 ते 6 महिन्यांनंतर जाणवतो हा फायदा हळूहळू होतो. हा फायदा व्यक्तीला मोजता येत नाही किंवा त्वरित लक्षात येत नाही.

त्यामुळे डॉक्टरांकडून उपचार सुरू केल्यावर 1-2 महिन्यात फायदा दिसला नाही म्हणून उपचार बंद करणे लगेच डॉक्टर बदलविणारे उपचार न घेणे असे बरेच जण आढळतात.

तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन योग्य प्रमाणात टीकाऊ स्वरुपाचा फायदा कधी होईल अथवा फायदा होईल की नाही याची शहानिशा करणारे लोक फार कमी प्रमाणात आढळतात.

केसांच्या वाढणार्‍या अवस्था – केसांची वाढ टप्पाटप्प्याने होत असते. केस वाढावयाच्या तीन अवस्था असतात. वाढीची अवस्था तीन वर्षे र्‍हास अवस्था (3-6 महिने) व विश्रांतीची अवस्था (3-6 आठवडे) या वाढण्याचा अवस्थांमधून नियमितपणे जात जाऊन पुन्हा केस वाढतात रोज आपले काही केस गळतात ते नॉर्मल असते. केसांच्या निरोगीपणामुळे रोज काही केस गळूनही केस टिकून असतात.

 

 

LEAVE A REPLY

*