आरोग्यदूत : अनावश्यक केस

0

माणसाच्या शरीरावर एकंदरीत 50 लाख केस असले तरी ते सर्व वाढलेले नसतात. डोक्यावरील भुवयांवरील, पापण्यांवर केस हवे हवेसे वाटतात.

दाढी-मिशा वाढवणार्‍या पुरुषांना या भागातील केस आवश्यकच वाटतात. पण इतर भागात जास्त प्रमाणात केस वाढल्यास ते अनावश्यक बनतात.

शरीराअंतर्गत असणार्‍या काही हार्मोन्सच्या असंतुलनता बदलामुळे, इतर कारणांमुळे अथवा प्रत्यक्ष लक्षात न येणारे कारण नसताना देखील चेहर्‍यावर व शरीराचे इतर भागावर अनावश्यक वाटणारे केस बर्‍याचशांमध्ये वाढतात.

काही स्त्रियांच्या बिजांड प्रक्रियेत ओव्हरीमध्ये कमी-अधिक, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दोष निर्माण झाल्यामुळे हार्मोन दोष निर्माण होतात. हे नको असणारे केस चेहर्‍यावर किंवा चेहर्‍याचे काही भागावर शरीराचे इतर भागांवर वाढतात.

हा दोष असणार्‍या स्त्रियांमध्ये लठ्ठपणा वाढतो. पाळी नियमित नसते. चेहर्‍यावर मुरुम/पिंपल्स वाढतात. त्यामुळे त्या इतरांसोबत मिसळणे टाळतात.

डॉ प्रमोद महाजन लेसर व कॉस्मेटिक सर्जन (९८२२०५२९०१)

बर्‍याच स्त्रियांमध्ये हार्मोन्सचा स्तर नॉर्मल असला तरी विशिष्ट हार्मोन अति संवेदनशिलतेमुळे अनावश्यक केसांची समस्या वाढू शकते. शरीरातील काही रोगांमुळे व काही प्रकारच्या औषध सेवनामुळे देखील केस वाढतात.

काही पुरुषांमधील आवश्यक वाटणारे, डोक्यावरील केस वयाच्या मानाने लवकर कमी होतात व शरीराचे इतर भागावर बरेच अनावश्यक केस वाढतात. पुरुषांमध्ये वाढत्या वयात कानाचे पाळीवर केस वाढतात.

पुरुषांमध्ये खालच्या पापणीच्या बाह्य अर्ध्या भागाखाली अनावश्यक केस वाढतात. काहींमध्ये दाढीचे केस फार जाड असतात व वेगाने वाढतात त्यामुळे त्यांना दाढी करण्याचा त्रास होतो व तेथील त्वचेचे सौंदर्य घसरते अशा लोकांमध्ये दाढीचे केस लेसरने कमी अथवा नाहीसे करता येतात व दाढी करणे सहज सुसह्य होते.

काहींना दोन्ही भुवयांच्या मधील जागेत, नाकावर केस वाढतात. बर्‍याचदा स्त्री, पुरुषांचे भुवयांचे कडांवर अनियमितपणे व अस्ताव्यस्तपणे हे केस वाढतात. त्यामुळे भुवयांचा आकार अनाकर्षक वाटतो.

प्रत्येक वेळच्या उपचारानंतर केसांची जाडी, केसांची संख्या व केसांच्या वाढीचा वेग कमी होतो. काही व्यक्तींमध्ये अनावश्यक केस 100 टक्के जातात तर इतरांमध्ये 80 ते 90 टक्के कमी होतात.

शिल्लक राहिलेल्या केसांची जाडी फारच कमी असते. रंगाने ते फिके असतात. त्यामुळे ते लवसारखे सहज दिसत नाहीत. म्हणून त्या भागातील त्वचेचे सौंदर्य टिकते. जगात कुठेही लेसर उपचार घेतलेत तरी ते शिल्लक राहिलेले बारीक केस सहजपणे कमी होत नाहीत.

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

*