आरोग्यदूत : बहिरे मूल

0

मूल बहिरे झाल्यास ते बहिरेपण दुरुस्त होऊच शकत नाही असा गैरसमज काही लोकांमध्ये असतो. त्यामुळे असे लोक गांभीर्याने औषधोपचार करीत नाहीत.

काही लोक उपचारासाठी पैसा हवा म्हणून नंतर सोयीने उपचार करू, असे वेळकाढू धोरण अवलंबितात. यामुळे योग्य वेळ हातातून निघून जाते.

खेडेगावातील मुलांमध्ये व झोपडपट्टीत राहणार्‍या मुलांमध्ये असे लक्षात येते की या मुलांच्या आई-वडिलांना बहिरेपणावर औषधोपचार योजना तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच करून घ्यावयास पाहिजे.

याची जाणीवच नसते. हे लोक इतर गावठी उपाय करतात. त्यामुळे ह्या मुलांना कायमचा बहिरेपणा येतो. अशा मुलांची संख्या भारतात बरीच आहे.

बहिरेपणांमुळे मुलांमध्ये निर्माण झालेला स्वभावाचा विचित्रपणा, बुद्धिमत्तेच्या व व्यक्तिमत्त्वाच्या मर्यादा, आई-वडिलांचे चुकीचे धोरण इ. कारणांमुळे बहिर्‍या बालकांचा व्यक्तित्व विकास खुंटतो.

डॉ प्रमोद महाजन लेसर व कॉस्मेटिक सर्जन (९८२२०५२९०१)

स्वत:च्या या कानाच्या अपंगत्वामुळे ही मुले स्वभावाने बुजरी बनतात. स्वत:च्या कमीपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे ती एकलकोंडी बनतात.

स्वत:च्या वयाच्या मित्रांमध्ये ते व्यवस्थितपणे मिसळू न शकल्याने सवंगडी त्यांना चिडवितात. आई-वडिलांच्या अशा मुलांबद्दल असलेल्या दृष्टिकोनावरून त्याचा स्वभावधर्म व व्यक्तिमत्त्व बनते.

त्याच्या अपंगत्वाचा त्याच्या कुटुंबियांकडून वा मित्रांकडून वारंवार उपहास होत असेल तर ते समाजात अथवा घरात वागताना हेकेखोरपणे वागतात. त्यामुळे वडीलधारी कुटुंबीय मंडळी व बहिर्‍या मुलांमध्ये दूरत्व निर्माण होते.

अशी मुले योग्य संस्कार शिकण्यापासून लांब राहतात. योग्य सवयी शिकण्यास व त्या लावून घेऊन पाळण्यास उत्सुक नसतात.

म्हणून मूल वगण्यात अयोग्य आहे अशी घरच्या लोकांची समजूत होते व त्यामुळे बहिर्‍या मुलाकडे दुर्लक्ष होते. ही दुर्लक्षित मुले मानसिक नैराश्यामुळे घरात आई-वडील, भाऊ-बहिणींना योग्यपणे सहकार्य देत नाहीत. त्यांचे मन स्वदोषामुळे चिंताग्रस्त असते.

ही मुले बुद्धिमत्तेने सहसा तीक्ष्ण असतात. त्यांची निरीक्षण शक्ती अचूक असते. समोरची व्यक्ती नेमके काय बोलली अथवा त्या व्यक्तीला नेमके काय म्हणायचे आहे हे त्यांना निरीक्षणामधून लगेच लक्षात येते.

आपल्या बहिरेपणाच्या दोषाची कमतरता तीक्ष्ण दृष्टी व स्पर्श संवेदना या विशिष्ट संवेदना ग्राहक अवयवांमार्फत ते भरून काढतात.

LEAVE A REPLY

*