आरोग्यदूत : मन रमेना कामात

0

काही काम करणारी मंडळी दिवस आणि रात्रपाळी अशा वेळेच्या सततबदलत्या स्वरुपात काम करतात. या लोकांमधे दिसून येणारी एक मानसिकसमस्या म्हणजे ‘नीद्रानाश’. दिवसभरातील मानसिक व शारीरिक हास भरून काढणे, अंगाचे तापमान नियंत्रीत ठेवणे, ऊर्जाशक्तीचे संरक्षण करणे, चयापचय संबंधी गरजा भागविणे, इत्यादी झोपेची काही कार्ये आहेत.

व्यत्ययरहीत आणि परिपूर्ण काळासाठी झोप कायम राहण्यासोबतच उठल्यावर ताजेतवाने वाटणे, उत्साही व ऊर्जावर्धक जाणवणे अशी सुध्रूड झोपेची लक्षणे आहेत.

म्हणून आपल्या शरीर क्रियेत झोपेची महत्त्वपूर्ण भूमिका असते. सतत बदलत्या पाळीच्या कामामुळे या क्रियेत दोष निर्माण होऊन झोपेच्या विकारांना जन्म देतात. नीद्रानाश हा त्यापैकी सर्वाधिक आढळणारा मनोविकार होय.

दीर्घकाळाच्या नीद्रानाशामुळे प्रतिकारशक्ती खालावते, चीडचीडेपणा येतो, नैराश्य, आलिप्तपणा येतो, कामाचा दर्जा खालवतो, रस्त्यांवर अथवा कामाच्या ठिकाणी अपघात होण्याची संभावना बळावते.

तसेच स्वयंचिकीत्सेमुळे दारू, झोपेच्या गोळ्या वा तत्सम पदार्थांचे व्यसन जडण्याचा धोका संभवतो. समुदेशन, नीद्राआरोग्याचे नियम समझून त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे, राहणीमानात आवश्यक ते बदल करणे आणि मुळ विकाराचा उपचार हे नीद्रानाशात लाभदायी ठरतात.

डॉ. महेश भिरूड,
एम. डी., मानसोपचार
0253-2317785

याव्यतिरिक्त डिप्रेशन, भीती-चिंतारोग, स्किझोफ्रेनिया असे अनेकमनोविकार कामामध्ये अडथळे आणतात आणि रुग्णाला कामात पांगळे बनवितात.

कामाच्या ठिकाणी दुर्लक्षित मानसिक स्वास्थाचे आणखी एक कारण म्हणजे मनोविकारांबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज. सर्वच मनोविकार रोग्याला वेडा करत नाही आणि मानसोपचार तज्ञ हे फक्त वेड्यांचेच डॉक्टर नसतात.

अनुवांशिकता, मेंदुतील जीवरासायनिक बदल,इजा, इत्यादीमुळे मनोविकार होतात भूतबाधा किंवा करणीमुळे नाही आणि म्हणून ते औषधांनी बरे होतात झाडफूक वा जादुटोण्याने नव्हे.

बिघडलेल्या मानसिक स्वास्थ समस्या सर्वच कामाच्या ठिकाणी दिसतात आणि आजारामुळे घेतल्या जाणार्‍या सुट्ट्यांचे प्रमुख कारण बनतात.

मानसिक आणि शारीरिक स्वास्थाचा घनिष्ठ संबंध असल्यामुळे खराब मानसिक आरोग्य आणि कामाशी निगडीत ताण तणाव यांचा वाईट प्रभाव पडून शारीरिक आरोग्यसुद्धा धोक्यात पडते.

त्यामुळे प्रत्येक कार्यस्थळी मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती, आजारांचे लवकरात लवकर निदान आणि संपूर्ण उपचार सर्वांसाठी लाभदायी ठरतात.

सर्वच कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्यासाठी पोषक वातावरण निर्मिती व्हावी. त्यासाठी उद्योगसमूह, प्रतिनिधी आणि कामगार यांचेकडून काही बदल अपेक्षित आहेत.

जसे, शारीरिक इजा झाल्यास जितक्या तातडीने उपचार केले जातात तितक्याच घाईने मानसिक अस्वस्थतेसाठीही उपचार उपलब्ध करून द्यावेत.

तसेच प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याबद्द्ल जागरुकता ठेवावी, काळजी घ्यावी, निरोगी स्वस्थ जीवनाचा प्रचार प्रसार व्हावा, नियमित शारीरिक व बौद्धिक व्यायाम करावा, स्वतः आणि कुटुंबासाठी रिकामा वेळ काढावा, मित्रमंडळी सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हावे, काम आणि जीवन-आयुष्य यांच्यात स्पष्ट अंतर असावे.

उद्योग समूहांनी देखील आपल्या कामात चोख निपुण कामगारांना त्यांच्या कामाबद्दल पुरस्कृत करावे, त्यांची प्रशंसा करून बढावा द्यावा, मानसिक आरोग्याबद्द्ल प्रतिनिधींना प्रशिक्षण द्यावे जेणेकरून ताण तणावांचे संकेत लवकर ओळखता येतील, टिंगलटवाळी, गुंडागिरी, दादागिरी अशा मानसिक स्वास्थाचे खच्चीकरण करणार्‍या वाईट प्रथांना आळा बसेल, तणाव नियोजन व्यवस्थित करता येईल, कुणाला मानसिक समस्या जाणवल्यास त्वरित तज्ञांमार्फत शास्त्रीय उपचार उपलब्ध करून देता येतील. तसेच शारीरिक वा मानसिक आजारांमधे दुजाभाव नसावा आणि मानसिक समस्यांनी ग्रासलेल्यांना मदतीचा आधार मिळावा.

LEAVE A REPLY

*