आरोग्यदूत : बाळ हवे

0

हल्ली सर्वांना शिकलेली व कमावती बायको हवी असते. खर्चाचे नियोजन नीट होण्यासाठी हे आवश्यकही असते. मग करीअर घडवण्याला प्राथमिकता असते.

बाळाचा विचारही मनात येत नाही आणि काही वर्षांनी जेव्हा प्रेग्नंसी रहात नाही. तेव्हा खूप निराशा वाटते. कामाचा तणाव, जोडप्याला न मिळणारा निवांतपणा, शारीरिक व्याधी ह्यामुळे अडचणी येऊ शकतात. अशावेळी डॉक्टरांकडून समुपदेशन महत्त्वाचे ठरते.

आता ज्या जोडप्याला बाळ हवंय, त्यांच्या नियोजनाबद्दल बोलू या. लग्नानंतर लवकर लवकर पहिले बाळ व्हावे असे बर्‍याच कुटुंबियांना, खास करून मुलीची आई व सासुबाईंना वाटत असते.

मुलीचे वय, वजन, रक्तगट, शारीरिक आजार, पाळीची नियमितता पहाणे आवश्यक असते. तसेच पतीचे आरोग्य, दिनचर्या, झोप, शारीरिक व्याधी देखील पहायला हव्यात.

डॉ रविराज खैरनार डॉ अर्चना खैरनार
(स्त्री रोग प्रसूती तज्ञ)

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ, दारू वीर्याच्या क्षमतेवर परिणाम करतात. त्याचे सेवन बंद करण्याचा माफक व्यायाम व पुरेशी झोप घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

कारण त्याचे आश्चर्यकारक सकारात्मक बदल पहावयास मिळतात. शारीरिक संबंध ठेवण्यातील अडचणी कुणाशी बोलताना संकोच वाटतो.

सोशल मीडियावरून मिळालेल्या अज्ञानातून चुकीचे संदेश मिळतात. अशावेळी तुमचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर समुपदेशन करू शकतात.

ही अत्यंत महत्त्वाची समस्या बर्‍याचदा चर्चिली जात नाही. पेशंट सांगत नाही व डॉक्टर विचारत नाही आणि मग प्रेग्नंसी रहात नाही! पहिल्या 3 महिन्यात बाळाच्या मेंदूची व मणक्यांच्या संरचनेची वाढ प्रामुख्याने होत असते.

ती वाढ निकोप व्हावी ह्यासाठी आवश्यकता असते. फोलिक अ‍ॅसिड ह्या व्हिटामिनची. प्रेग्नंसी रहाण्याआधीच जर फोलिक अ‍ॅसिडची एक गोळी पेशंटने रोज एक ह्याप्रमाणे दोन महिने घेतली तर त्याचा पुरेसा साठा आधीच शरीरात असतो. त्यामुळे बाळांमध्ये विकृती, व्यंग होण्याचे प्रमाण एकदम कमी होते.

प्रेग्नसींतसुद्धा पहिले 3 महिने ही फोलीक अ‍ॅसडची गोळी घेण्याचा सल्ला म्हणूनच दिला जातो. आयोडीनयुक्त मीठाचा वापर आता सर्वत्र होतो आहे. त्यामुळे देखील बाळाच्या मेंदूची निकोप वाढ होण्यास मदत होते. पुढील लेखात गरोदरपणातील सुरुवातीच्या 3 महिन्यांबद्दल माहिती घेऊ यात.

 

 

LEAVE A REPLY

*