आरोग्यदूत : बंद गर्भनलिका उघडण्यासाठी

0

काही वेळा, पिसार्‍यासारखा असणारा ‘फिंब्रियल एंड’ हा टोकाचा भाग. तेथे सूज आल्याने एकमेकांना चिकटला जातो आणि त्याचे टोक आत येऊन वरून पाकळ्यांप्रमाणे भाग येऊन येथे गर्भनलिका बंद होते.

त्या मानाने हा गर्भनलिकेचा भाग बराच रुंद असतो. पण तो बंद झाल्यावर त्यात सूज येऊन पाण्याप्रमाणे द्रवपदार्थ साठत जातो आणि गर्भनलिका या टोकाशी फुग्याप्रमाणे फुगू लागते. ताणली जाऊ लागते.

याला ‘हायड्रोसाल्पिंग्ज’ म्हणतात. काही वेळा जंतूंच्या प्रादुर्भावाने येथे पाण्याऐवजी ‘पू’ साठत जातो किंवा जखमातून रक्त (सूक्ष्म) साठते.

गर्भनलिका ताणली जाऊन, फुग्यासारखी झाली की तिच्या सर्व अस्तरांना इजा पोहोचते. फिंब्रियल एंड हा स्त्रीबीज पकडणारा अति संवेदनाक्षम भाग असल्याने त्याचे काम महत्त्वाचे असते. पण त्याचा अशाप्रकारे जंतू ‘बट्ट्याबोळ’ करतात.

डॉ नेहा लाड
डॉ नितीन लाड

काही वेळा जंतूंचा अ‍ॅटॅक संपल्यावर गर्भनलिका वरून ठाकठीक दिसतात. त्यांची पोकळीही मोकळी असते. पण त्यांची लवचिकता, स्त्रीबीज नेण्याची शक्ती नाहीशीच झालेली असते. अशा वेळी या गर्भनलिका मोकळ्या असूनही गर्भधारणेसाठी त्यांचा शून्य उपयोग असतो.

एकदा दोन्हीही गर्भनलिका खराब होऊन बंद झाल्या की गर्भधारणा होण्याची शक्यता अजिबात राहत नाही आणि चुकून गर्भधारणा झालीच तर एक्टॉपिक प्रेगन्सी यासारखा अतिशय गंभीर, जीवाला धोका असणारा प्रकार घडू शकतो.

बंद नळ्या उघडण्यासाठी ऑपरेशनशिवाय आज तरी योग्य मार्ग नाही आणि या ट्युबोप्लास्टी नावाच्या विविध ऑपरेशनमध्ये बंद गर्भनलिका मोकळी केली गेली तरी दिवस राहण्याची शक्यता फारच कमी असते.

कारण कोणी कितीही बढाया मारल्या तरी फार तर बंद गर्भनलिका मोकळ्या होतील पण जळून गेलेल्या गर्भनलिकेच्या आतल्या अस्तराचे काम सुरू होणे फार अवघड असते आणि त्याशिवाय चांगली गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी असते !

मायक्रोस्कोपीक सर्जरी, केसांसारखे सात झिरो, आठ झिरो, दहा झिरो इत्यादी शिवण्याचे विविध धागे यांनी गर्भनलिका मोकळी होऊन जोडलेले भाग नीटस दिसतील. पण गर्भनलिकेचे नैसर्गिक काम चालू होणे ही दैवाची खैर !

 

LEAVE A REPLY

*