रक्तदाब नियंत्रणातील नित्य नैमित्तिक समस्या
ही औषधे नियमितपणे घेतली पाहिजेत. कारण रक्तदाबातील चढउतार अधिक धोकादायक ठरतात. अशा परिस्थितीत रुग्णास पक्षाघात, मेंदूतील रक्तस्त्राव अशी समस्या निर्माण होऊ शकते.

ज्या ज्या औषधांचा 24 तास इष्ट परिणाम दिसून येतो अशीच औषधे वापरावीत. कारण अशी औषधे दिवसातून एकदाच घ्यावी लागतात.

1) चोवीस तास परिणाम दाखवणारी औषधे म्हणजे टेल्मिसार्टन/ ओल्मेसार्टन, सीटीडी, अ‍ॅम्लोडिपीन/ क्लिनिडिपीन ही औषधे उपयुक्त, मात्र कॅप्टोप्रिल, लोसार्टन इ. दिवसातून दोन वेळा घ्यावी लागतात. शिवाय ती नीट लागू पडत नाहीत.

2) बहुतांशी औषधे जठरात योग्य रितीने शोषली जातात. जठराला त्याचा त्रास होत नाही. रिकाम्या वा भरल्या पोटी केव्हाही घेतली तरी चालतात. वेळ पाळणे हे महत्त्वाचे असते.

3) उलट्या होणे वा अतिसार काही वेळा या औषधांमुळे शरीरातील पाणी व क्षार यांचा त्रास होतो व रक्तदाब खाली घसरतो. म्हणून रक्तदाब मोजल्यानंतर योग्य परिस्थितीत, योग्य औषध सुरू करावे. मोठ्या प्रमाणात उलटी वा अतिसार होत असल्यास औषधे थांबवावीत.

4) संसर्गबाधा- यामुळे रक्तदाब कमी-जास्त होत राहतो. तापामुळे घाम येतो. उलट्या होतात. मज्जासंस्था उत्तेजित होते व रक्तदाब अनियंत्रित होतो. अशावेळी रक्तदाबाचे प्रमाण पाहून डोस ठरवावा.

5) प्रवासात होणारा त्रास – प्रवास करताना देखील औषधे घेण्याची वेळ टाळू नये.

LEAVE A REPLY

*