आरोग्यदूत : हेयर ट्रान्सप्लांट

0

डोक्यावर भरपूर केस असलेली व्यक्ती तरुण दिसते. म्हणूनच बर्‍याचशा व्यक्ती तरुण वयात केस कमी झाल्याने निर्माण झालेल्या टक्कलमुळे वयस्कर वाटतात.

केशरोपण शस्त्रक्रिया अथवा हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी म्हणजे डोक्याच्या मागच्या भागावरील अथवा शरिरावरील नको असणार्‍या केसांच्या जिवंत मुळांचे केस गळालेल्या डोक्याच्या पुढच्या भागावर अथवा शरिरावरील इतर भागावर (उदा. भुवया, पापण्या) शस्त्रक्रियेने रोपण करून त्या भागाची शोभा वाढवणे. हे रोपण केलेले केस नंतर वाढत राहतात.

डोक्याच्या मागच्या भागातील केसांचे आयुष्य जास्त प्रमाणात असल्यामुळे हे केस बरीच वर्षे वाढत जातात व टिकतात.
वयाच्या 35-40 वर्षांपर्यंत बहुतेक व्यक्तींमध्ये प्रभावीपणे केशरोपण करण्यासाठी पुरेसे केसे असतात.

डॉ प्रमोद महाजन

रोपण केलेल्या केसांमुळे व्यक्ती अधिक तरुण दिसते. तिच्या व्यक्तिमत्त्वात प्रभावीपणा वाढतो. सामान्यपणे केशरोपण डोक्याच्या पुढच्या भागात केले जाते.

पण भुवया, पापण्या, दाढी, जखमेचा व्रण, अशा इतरही भागात केशरोपण करता येते. ज्यांच्या मध्ये केस जास्त प्रमाणात गळालेले असतात अथवा ज्यांना दाट केस हवे आहेत त्यांचेमध्ये केशरोपणाची शस्त्रक्रिया 6-8 महिन्यांच्या अंतराने 2 ते 3 वेळा करण्याची गरज असते.

कारण एकाच वेळी अतिदाट स्वरुपात केशरोपण करणे व ते जगविणे स्थानिक कारणांमुळे शक्य नसते. एका वेळी 500 ते 3000 केस लावता येतात व ते केस जगतात.

केशरोपण शस्त्रक्रियेमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे. केशरोपणाच्या सूक्ष्म शस्त्रक्रियेमध्ये एका वेळी एक ‘हेअर फॉलिकल ग्राफ्टिंग’ केले जाते. (याला ‘मायक्रो ग्राफ्टिंग’ म्हणतात.)

प्रत्येक ग्राफ्टमध्ये यात एक अथवा दोन केसांची मुळे असतात. केसांची ही मुळे वाढत राहतात. ते केस नैसर्गिक केसांसारखे केस दिसतात व टिकतात. त्यांना कापता येते. त्यांना विशेष निगा घेण्याची गरज नसते.

ही केसांची मुळे आपल्या डोक्याच्या मागच्या भागावरील त्वचेतून काढल्यामुळे त्यांचे आयुष्य डोक्याच्या इतर भागावरील केसांपेक्षा जास्त असते.

सभोवतालच्या केसामुळे त्या जखमेचा व्रण काही दिवसांनंतर दिसत नाही. केशरोपण करण्यासाठी काढलेल्या त्वचेपासून 4 ते 5 तंत्रज्ञांची चमू एक एक सूक्ष्म ‘केस गटरोप’ (‘मायक्रो ग्राफ्ट’ हेअर फॉलीक्यूलर युनिट) सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहून बनवतात.

ज्यांना डोक्याचे मागचे भागावर टाक्यांची जखम नको असते त्यांच्यामध्ये डोक्यावरील केसांचे एक एक मूळ काढून त्याचे रोपण केले जाते. याला फॉलीक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन  हेअर ट्रान्सप्लांट म्हणतात.

केशरोपणाचे एफ. यु.ई. तंत्राच्या प्रत्येक ग्राफ्टमध्ये एक ते चार केस असतात या ग्राफ्टचे इच्छित असलेल्या भागावर रोपण केले जाते.

LEAVE A REPLY

*