एच.आय.व्ही. सह जगणार्‍या रुग्णांची सुश्रृषा करताना बर्‍याच वेळा डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, आया, नातेवाईक यांचा रुग्णाच्या सुया/रक्ताशी संबंध येऊ शकतो व एच.आय.व्ही. संसर्ग होण्याचा धोका होऊ शकतो.

परंतु अशा मार्गाने एच.आय.व्ही. संसर्ग होण्याचा धोका फक्त 0.3 टक्के एवढाच असतो. तरी आपण काय काळजी घ्यावी? ह्या संबंधीची माहिती..

* व्यावसायिक आघात, संपर्कापश्चात औषधोपचार विषयी नियमावली. * व्यावसायिक आघात, पुढील बाबीतून होऊ शकतो. तीक्ष्ण हत्यारे, रक्त इतर मानवी शरीर स्त्राव (वीर्य, मेंदूतील, फुफ्फुसातील, गुडघ्यातील अंर्तस्त्राव इ.)
वरीलप्रमाणे आघात झाल्यास हे करा!

* शांत रहा! तीक्ष्ण हत्यांराची योग्य विल्हेवाट लावणे.

* प्राथमिक उपचार : स्वच्छ पाण्याने साबणाने जखम झालेली जागा स्वच्छ धुणे. (जखम/जर डोळ्याला/ नाकाला, तोंडात झाली असेल तर स्वच्छ पाणी किंवा सलाईन वापरावे.)

* संपर्क पश्चात औषधोपचारांसाठी मुलभूत तपासण्या करणे. * एच.आय.वही.ची एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रे येथे तपासणी करून घेणे.

* संपर्क पश्चात औषधोपचार संपर्क झाल्यापासून 2 तास ते 72 तासाच्या आता (अठढ) सुरू करणे आवश्यक आहे. संपर्क पश्चात औषधोपचार कमीत कमी 4 आठवडे (28 दिवस) घेणे आवश्यक आहे.

* एच.आय.व्ही. तपासणीसाठी पाठपुरावा करणे (6 आठवडे, 6 महिने, 3 महिने पुनर्नेट/ फेरतपासणी) * समुपदेशन व काळजीसाठी पुनर्भेट. * गरोदर माता किंवा अंगावर दूध पाजणार्‍या माता यांनी त्वरित डॉक्टरांना कळवावे.

डॉ. सुनील ठाकूर
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
ए.आर.टी. सेंटर
मो. 9921587957

 

हे करू नका!
* घाबरू नका/गोंधळू नका.

* बाधा झालेले बोट तोंडात घालू नका.

* जखमेस दाबू नका.

* जखमेवर कोणतेही जंतुनाशक औषधे लावू नका.

(उदा. ब्लिच, क्लोरी, स्पिरीट, बेटाडीन इ.)

 

LEAVE A REPLY

*