गर्भपात

0

गर्भपात हा शब्द शास्त्रीय, सामाजिक व आर्थिक कारणांनी ‘घडवून’ आणलेल्या गर्भपाताबद्दल वापरण्याची पद्धत आहे. त्याला ‘एमटीपी’ (एम.टी.पी.- मेडिकल ट्रीमिनेशन ऑफ प्रेग्नन्सी) म्हणतात. जो गर्भपात नैसर्गिकरित्या होतो. त्याला ‘धुपावर जाणे’ अथवा ‘मिसकॅरेज’ हा शब्द साधारणपणे प्रचलित आहे.

सामान्यत: 10 टक्के गर्भधारणांची परिणती दोन-तीन महिन्यांत गर्भपातामध्ये होत असते. याला कारणेही बरीच आहेत.
ज्याप्रमाणे फळ सदोष असल्यास पूर्ण वाढ न होताच ते झाडावरून गळून पडते.

डॉ. विकास गोगटे
एम.बी.बी.एस.
मोबा. 9822118066

त्याप्रमाणेच गर्भ सदोष असला तर तो बर्‍याच वेळा पडून जाणे ही निसर्गाचीच रचना असते. क्वचित खूप भीती वाटून गर्भपात होतो. त्या अवस्थेवरूनच गर्भगळीत होणे हा वाक्प्रचार आला असावा.

काही वेळा स्त्री गर्भवती असूनही पहिल्या एक-दोन महिन्यांत तिच्या मासिक पाळीच्या तारखेस मामुली रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यात विशेष काळजी करण्यासारखे काही नाही.

मात्र वेदनारहित रक्तस्त्राव सतत होत राहिल्यास त्याची काळजी घ्या. केवल किरकोळ पडण्याझडण्याने गर्भपात होत नाही. कारण गर्भ गर्भाशयात सुरक्षित स्थितीत असतो.

काळजी घ्या स्वत:ची
पाळी चुकल्यावर, गर्भधारणेचे निदान पक्के झाल्यावर स्त्रीच्या अंगावरून जर रक्तस्त्राव होऊ लागला तर तिला पूर्ण विश्रांती द्यावी. त्यासाठी आडवे झोपून राहणे चांगले.

पायाकडील बाजू 10-12 इंच उंच करणे अधिक फायदेशीर ठरते. स्वच्छ सॅनिटरी नॅपकीन वापरावा. अंगावर जात असलेल्या स्त्रावाचे अथवा गाठ गेल्यास त्याचे सॅम्पल डॉक्टरांना दाखवण्यासाठी जवळ ठेवावे. शरीरसंबंध टाळावा.

बद्धकोष्ठता होऊ देऊ नये. यासाठी पालेभाज्यांसारख्या सारक पदार्थांचा वापर अधिक प्रमाणात करावा. रेचक मात्र नको. विश्रांती व वरील उपायांनी बर्‍याच वेळा रक्तस्त्राव थांबतो.

डॉक्टरांकडे गेल्यानंतर तपासणी व सोनोग्राफी करून डॉक्टर हार्मोन्स, डुवाडिलान इत्यादी औषधांचा वापर करतात. गर्भाची वाढ नीट नसेल तर मात्र डॉक्टर गर्भाशय पिशवी साफ करण्याचा सल्ला देतील. यालाच डी अँड सी असे म्हणतात. अतिरक्तस्त्राव थांबवण्याचा हाच एकमेव इलाज आहे.

शेवटी थोडी गंमत- एक कानाचे डॉक्टर व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर यांचे दवाखाने शेजारी शेजारी असतात. एक बाई स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन आपल्या कानाची पाळी ओढून दाखवते.

त्यांना वाटते की, बाईंना कानांचे डॉक्टर हवेत. म्हणून ते विचारतात. काय कान दुखतो का? त्यावर बाई परत कान ओढते व म्हणते, पाळी लांबली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*