आरोग्यदूत : स्वाईन फ्लू ,डेंगू …

0

वर्तमानपत्र उघडल्यानंतर कोणत्यातरी पानावर एखाद्या आजाराच्या उद्रेकाची बातमी निश्चित आढळते. इबोला व झिका हे विषाणू आंतरराष्ट्रीय स्तरावर धुमाकूळ घालतात.

महाराष्ट्राच्या बाबतीत डेंग्यू, चिकुनगुन्या व स्वाइन फ्लू, (एच. वन एन वन फ्लू) यांनी जनतेला भंडावून सोडले आहे. ही काही नवीन बाब नाही.

मानवी उत्कांतीमध्ये विकास आणि संकट दोन्ही बाबी समाविष्टच आहेत. वैयक्तिक आणि सामूहिक दोन्ही स्तरावर संकटे आलेली आहेत.

जेव्हा एखादा आजार एकाच वेळी खूप लोकांना होतो, तेव्हा त्याला आजाराची साथ, अथवा आजाराचा उद्रेक असे म्हणतात.

इतिहासात अशा साथींची अगणित उदाहरणे आहेत. आयुर्वेदातसुद्धा ‘जन-पद-उध्वंस’ म्हणजेच साथीचा व पर्यायाने त्याच्या कारणांचा उल्लेख आहे. ‘खूप’ शब्द तसा सापेक्ष आहे.

म्हणून त्या त्या स्थळी त्या त्या काळी आढळलेल्या रुग्णापेक्षा निश्चितच जास्त जणांना लागण झाल्यास त्याला उद्रेक असे म्हणतात. क्वचितच आढळणार्‍या रोगाची लागण थोड्या लोकांना झाली तरीही त्याला उद्रेक असेच म्हणतात.

साहजिकच नेहमी आढळणार्‍या रोगांच्या बाबतीत उद्रेक संबोधण्यासाठी लागण बरेच खूप लोकांना झालेली हवी. सामान्यत: संसर्गजन्य (संक्रमक) रोगाच्या साथी उद्भवतात.

बाजीराव सोनवणे
औषधनिर्माण अधिकारी
म.न.पा. नाशिक
मो. 9922420034

संसर्गजन्य आजार –

सूक्ष्म विषाणू, जिवाणू, परोपजीवी किंवा त्यांच्यापासून निर्मित विषारी पदार्थांचा आजारी व्यक्तीकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या (उदा. डास) निरोगी व्यक्तीकडे प्रसार झाल्यामुळे होणार्‍या रोकांना सांसर्गिक रोग असे म्हणतात.

कधी कधी रोग जनावरांकडून अशाच पद्धतीने माणसांमध्ये पसरू शकतो. संक्रामक रोगांनाच संसर्गजन्य रोग असेसुद्धा म्हणतात. विकसनशील देशामध्ये संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथे साथीसुद्धा विकसित देशापेक्षा मोठ्या प्रमाणात येतात आणि फैलावतात. क्षयरोग, हिवताप, कॉलरा, विषमज्वर, डेंग्यू, चिकुनगुन्या, हगवण, कावीळ, फ्लू, न्यूमोनिया, गोवर, लेप्टोस्पायरोसीस, मेंदू तथा मेंदू आवरण जवर (मेनिंनजायटिस) एच.आय.व्ही. हे संसर्गजन्व रोग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळतात.

संसर्गजन्य आणि साथीचे आजार –

वर उल्लेखलेल्यापैकी काही आजारांमध्ये झपाट्याने पसरण्याची क्षमता असते, म्हणूनच त्या आजाराच्या साथी उद्भवतात. देवी, कॉलरा, प्लेग, डेंग्यू, चिकुनगुन्या, विषमज्वर, कावीळ, फ्लू हे रोग साथीचे रोग म्हणूनच प्रसिद्ध आहेत. यापैकी देवी, कॉलरा, प्लेग या रोगांचा प्रसार पूर्वीच्या काळी झपाट्याने व देशोदेशी झालेला आहे. असा इतिहास आहे. जगभर पसरणार्‍या अशा आंतरराष्ट्रीय साथीच्या आजारांना (पॅनडेमिक) साथ आली असे म्हणतात.

LEAVE A REPLY

*