आरोग्यदूत : गर्भारपणातील धोकादायक आजार

0

प्रिएक्लम्पशिया- प्रिएक्लम्पशिया हा गर्भारपणातील एक धोकादायक आजार आहे. आणि गर्भारपणातील गुंतागुंतही आहे. हा आजार गर्भारपणाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये दिसून येतो.

या आजारामध्ये लघवीमध्ये प्रोटीनचे अल्बुमीनचे प्रमाण वाढत जाते आणि रक्तदाबही वाढत जातो. पायावर सूज येते. या व्यतिरिक्त दुसरी काही विशेष लक्षणे दिसत नाहीत.

ही लक्षणे -रक्तदाब व सूज वाढणे आणि लघवीला अब्ल्युमिन असणे- अशीच एक दोन महिने राहिले तर गर्भाशयातील बाळाची वाढ खुंटते.

यालाच आय.यू.जी.आर. असे म्हणतात. गर्भारपणातल्या नियमित तपासणीमुळे लघवीमध्ये अल्ब्युमिनचे प्रमाण आणि रक्तदाब नियमितपणे तपासला तर निदान होऊ शकते.

याचे वेळीच निदान आणि उपचार नाही झाले तर स्त्रीला गर्भारपणातील फिट बाळाची वाढ खुंटणे आणि काही वेळा बाळाचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

काही स्त्रियांमध्ये लिव्हरचा आजार- डिस्फंक्शन, किडनीचे आजार-फेल्युअर आणि रक्तामधील प्लेटलेटची संख्या कमी होणे यासारखे आजार उद्भवतात.

पण त्यांचे प्रमाण कमी असते. पण हे आजार प्राणघातक ठरू शकतात. ह्या स्थितीला हेल्प सिंड्रोम असे म्हणतात. हे सर्वात गंभीर स्वरुपाचे दुष्परिणाम आहेत.

माता मृत्यूंच्या एकूण कारणांपैकी 30 टक्के मृत्यू या हेल्प सिंड्रोममुळे होतात.

डॉ नारायण देवगावकर

गर्भारपण -वाढता रक्तदाबकोणामध्ये जास्त प्रमाणात होऊ शकतो.
1) पहिल्यांदा गर्भवी असलेली स्त्री (म्हणजेच प्रायमीग्रॅव्हिडा)

2) गर्भारपणात मधुमेहाचे दुखणे असेल तर.

3) स्थूलता (जास्त वजन असलेली स्त्री)

4) वाढत्या वयातील गर्भारपण

5) जुळा गर्भ

6) हायडेटीफॉन मोल- द्राक्षगर्भ

पहिल्या गर्भारपणात प्रिएक्लम्पशिया आजार झाला असेल तर पुढील गर्भारपणात हा त्रास पुन्हा होण्याचे प्रमाण साधारण 5 ते 10 टक्के असते.

गर्भारपणात प्रिएक्लम्पशिया हा आजार होण्यास विशिष्ट असे काही कारण नाही. जास्तीत जास्त विश्रांती आणि योग्य औषधाच्या वापराने त्यावर नियंत्रण ठेवता येते.

प्रिएक्लम्पशियामध्ये आय.यू.जी.आर. म्हणजे बाळाची खुंटलेली वाढ टाळता येणे शक्य नाही. दिवस भरण्याआधीच प्रसूती करून बाळाचा जन्म लवकर होऊ देणे हा उपचारांचा एक भाग आहे.

LEAVE A REPLY

*