अँजिओग्राफी

0

उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णात कॉरोनरी हार्ट डिसीज होण्याची शक्यता असते. असा आजार अनेक चाचण्या केल्यानंतरच स्पष्ट होतो. रुग्णांना कॉरोनरी हार्ट डिसीज किंवा स्ट्रोकसारखा आजार पुढे होऊ शकेल. असे वाटल्यास तुम्ही त्या काळात करून गेण्याच्या तपासण्या केल्या पाहिजेत. संपूर्ण हृदयाची सर्व तपासणी करणे इष्ट ठरते.

 कॉरोनरी अँजिओग्राफी – या चाचणीलाच कार्डियाक कॅथेटर चाचणी असेही म्हणतात. या चाचणीमुळे हृदयाच्या ह्या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्या आहेत काय आणि ते किती गंभीर आहे याचा शोध लागतो.

डॉ नारायण देवगावकर

 

त्याचबरोबर हृदयाच्या कप्प्यात किती प्रमाणात दाब आहे आणि हृदयाच्या स्नायूंचे काम कसे चालले आहे याचाही अंदाज येतो. अशा प्रकारच्या चित्रीकरणात दंडातील किंवा जांघेतील, रोहिणी रक्तवाहिनीतून एक मऊ कॅथेटर हृदयाच्या रक्त वाहिनीकडे पोहोचवतात.

क्ष किरणांच्या सहाय्याने हा प्रवास प्रत्यक्ष पाहता येतो. याचवेळी कॅथेटरमधून विशिष्ट रंगद्रव्य हृदयाकडे टोचले जाते. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या पडद्यावर दिसतात.

रंगद्रव्य टोचल्यावर अनेक क्ष-किरण फोटो घेतात. त्यातून रक्तवाहिन्यातील अडथळा- ब्लॉक दिसून येतो. ही सर्व चाचणी जी विशिष्ट जागा बधीर करून- लोकल अ‍ॅनेस्थेशिया- केली जाते. कॉरोनरी अँजिओग्राम ही चाचणी तुलनेने सुरक्षित आहे. व पुढे रुग्णात काही गुंतागुंत होण्याची शक्यता कमी असते.

या चाचणीमुळे हृदयविकाराचा झटका येणे, पक्षाघात होणे किंवा प्रत्यक्ष चाचणी चालू असताना रुग्ण दगावणे अशा घटना दुर्मिळ प्रमाणात होतात. 1000 रुग्णातून अवघ्या एक किंवा दोन रुग्णांचा मृत्यू होतो असे अनुमान आहे.

या चाचणीनंतर काही रुग्णात काही प्रमाणात किरकोळ त्रास संभवतो. उदा. कॅथेटरमधून रंगद्रव्य रक्तवाहिन्यात जाताच काही रुग्णांना वेगळे वाटते. कॅथेटर काढल्यानंतर काहींना किरकोळ रक्तस्त्राव होतो. दंडात किंवा जांघेत काहींना जखम होते.

LEAVE A REPLY

*