Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

स्त्रियांसह मुलींनी आपली मौलिकता सिद्ध करुन परिवर्तन करावे!

Share

स्त्रीचा जन्म म्हणजेच एका कलाकाराचा जन्म आहे. कारण एकाहून एक भूमिका निभावणारी स्त्री ही एकमेव व्यक्ती आहे. मुलगी, बहीण, मैत्रीण, पत्नी, सासू आणि सून अशा अनेक भूमिकेत ती जगत असते. पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो. आई, माता, जननी अशी अनेक विशेषणे लावली जातात. पण तिच्या अडचणी, गरजा,तिच्या इच्छा सगळ्याच पूर्ण होतात असे नाही.

आजची स्त्री आधुनिक विचारांची असून, तिला स्वत:चे अस्तित्व निर्माण करायला धडपडावे लागत आहे. आजच्या काळात महिला सुरक्षा हा एक संवेदनशील विषय असल्यामुळे त्याकडे सर्वांनीच गांभीर्याने बघण्याची गरज आहे. विविध कारणांमुळे तिला पुरूषांपेक्षा कमी लेखले जाते, तिच्यावर बंधने लादली जातात हे चुकीचे असून समाजाची तिच्याकडे पाहण्याची वृत्ती बदलायला हवी. मुला-मुलींमधील भेदभाव थांबायला हवा.

‘कामयाबी ना लडका देखती है। ना लडकीया, कामयाबी सिर्फ सोच देखती है।’ म्हणून मुला-मुलींमध्ये भेद करू नका. स्त्री ही त्याग, नम्रता, श्रध्दा व सुजाणपणा याची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. “मुलींनो, हे शतक आपले आहे. संधी गमावू नका, पुढे या आणि तुमची सकारात्मकता, मौलिकता जगाला दाखवा, स्वत:ला सिध्द करून जगाला पटवून द्या”.
– जिजाऊ राठोड, विष्णूनगर तांडा, ता.पाचोरा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!