Type to search

जळगाव

जि.प. शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

Share

येवती, ता.बोदवड | वार्ताहर – येथील शिक्षक ईश्वर जिवन मंडावरे हे दोन महिन्यापूर्वी येथील जि.प.शाळे नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दि.२१ रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी निलंबित केले आहे. श्री. मंडावरे यांना शिक्षण विभागामार्फत इतर ठीकाणी हजर होण्याबाबत कुठलीही नोटीस नसुन देखील येथील शिक्षकाला निलंबित करण्यात आले. याच्या निषेधार्थ ग्रामस्थांंनी आक्रमक होत. जि.प. शाळेला कुलूप ठोकले.

दरम्यान, दि. २३ रोजी सकाळी येथील विद्यार्थी शाळेसमोर जमा झाले असता पालकांसह शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सरपंच यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होऊन या कार्यवाहीच्या विरोधात निषेध व्यक्त केला. दरम्यान येथील पालक व ग्रामस्थांकांनी जो पर्यंत ईश्वर मंडावरे यांची नियुक्ती येथे पुन्हा करण्यात येत नाही तो पर्यंत सर्व पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा पवित्रा घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान होईल त्याला सर्वस्वी शिक्षण विभाग जबाबदार असेल असेल अशी भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त करत तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, मंडावरे यांनी तालुक्यातील शेवगा जि.प.शाळेत हजर व्हावे असा आदेश दि. १६ रोजी काढण्यात आला आहे. मात्र याबाबत श्री. मंडावरे यांना दि.२२ रोजी शिक्षण विभागाच्या वतीने केंद्रप्रमुख पी. एस. घुले आज स्वतः घेऊन जि. प. शाळेत आल्याने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला. पत्र घेऊन आलेल्या केंद्रप्रमुखांसमोर येथील ग्रामस्थांनी तिव्र संताप व्यक्त केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!